मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांकडे पाहिले, तर आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की, त्यांना काहीच अडचणी नसतील. मात्र, तसे नसते. सामान्य व्यक्तींप्रमाणे या कलाकारांनाही भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. काही कला असेही आहेत, ज्यांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता राजपाल यादव होय. राजपाल सन २०१७ मध्ये चांगलाच चिंतेत होता. त्यानंतर त्याला सन २०१८ मध्ये ५ कोटी रुपयांचे कर्ज फेडता न आल्यामुळे तुरुंगातही जावे लागले होते.
नुकतेच एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादवने आपल्या वाईट काळाबाबत मोकळेपणाने चर्चा केली. त्याला विचारले गेले की, त्याची वाईट काळात सर्वात जास्त मदत कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले की, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला मदत केली होती. तसेच त्याने हेही सांगितले की, एकेकाळी त्याच्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठीचेही पैसे नसायचे. (Comedian Rajpal Yadav Opens Up On Receiving Support From Bollywood While Facing Financial Difficulties)
तो म्हणाला की, “मला वाटते की, प्रत्येक व्यक्तीने इतरांसाठी आपले दरवाजे खुले केले पाहिजेत. जर लोक माझ्या मदतीला आले नसते, तर मी आज इथे कसा काय असतो? संपूर्ण दुनिया माझ्यासोबत होती. माझा स्वत:च्या पुढे जाण्यावर विश्वास होता. मला माहिती होते की, मला सर्वप्रकारचे समर्थन पाहिजे, जे मला मिळाले.”
इतकेच नव्हे, तर त्याने आपल्या संघर्षाच्या काळाबद्दलही चर्चा केली. त्याने म्हटले की, “जेव्हा तुम्ही मुंबईला येता, तेव्हा हे एखाद्या विचित्र नवीन शहरासारखे वाटते. जिथे आपल्याला बोरिवलीला जाण्यासाठी इतरांसह रिक्षा शेअर करावे लागते. मग, जेव्हा आपल्याकडे रिक्षासाठी पैसे नसतात, तेव्हा आपण जुहू, लोखंडवाला, आदर्श नगर, गोरेगाव येथे जाता. कधीकधी वांद्रेसुद्धा, आपला फोटो आपल्यासोबत घेऊन, यशाच्या शोधात. जर जीवन कठीण वाटत असेल, तर हेतू सोपा होतो. जीवन सोपे वाटते, नंतर उद्देश कठीण होतो.”
यापूर्वी तो शेवटचा ‘कुली नंबर १’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत वरुण धवन, सारा अली खान यांचा समावेश होता. राजपाल लवकरच शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मीझान जाफरीसोबत ‘हंगामा २’मध्ये झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!
-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ
-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल