प्रेक्षकांना खदखदून हसवणारा हास्य अभिनेता राजू श्रीवास्तव हा सध्या रुग्णालयात जीवन-मरणाच्या दरीत अडकला आहे. राजूला बुधवारी (दि. १० ऑगस्ट) हृदयविकाराचा झटका आला होता. तो जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्याला दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजूची स्थिती सध्या नाजूक आहे. अशात त्याच्या तब्येतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे, जी ऐकून चाहतेही दु:खी होऊ शकतात. राजूच्या मेंदूने प्रतिसाद देणे बंद केले आहे.
राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हा जिममध्ये बेशुद्ध झाल्यापासून ते रुग्णालयात दाखल होण्यापर्यंत जवळपास १० मिनिटांहून अधिक वेळ त्याच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूने प्रतिसाद देणे बंद केले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही वेळाने त्याची पल्स (हाताची नाडी) मिळू शकली होती. राजूची पल्स आणि हृदयाचे ठोके योग्यरीत्या काम करत आहेत. मात्र, मेंदू प्रतिसाद देण्यासाठी अजूनही त्याच्यावर न्यूरो उपचार सुरू आहेत.
View this post on Instagram
टाकण्यात आला नवीन स्टेंट
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राजूच्या हृदयात एक नवीन स्टेंट (छोटी ट्यूब) टाकण्यात आली होती. तसेच, दोन जुने स्टेंट बदलण्यात आले होते. यावेळी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी राजूच्या हृदयात नऊ स्टेंट टाकण्यात आले होते. बुधवारी सकाळी वर्कआऊट करण्यासाठी राजू दक्षिण दिल्लीमध्ये गेला होता. जेव्हा तो १२ वाजता वर्कआऊट करत होता, तेव्हा अचानक त्याच्या छातीत त्रास होऊ लागला, तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. यानंतर त्याला लगेच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोनवेळा झालीय एँजिओप्लास्टी
राजू श्रीवास्तव याची यापूर्वी दोन वेळा एँजिओप्लास्टी झाली आहे. पहिल्यांदा १० वर्षांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात आणि ७ वर्षांपूर्वी मुंबईच्याच लीलावती रुग्णालयात एँजिओप्लास्टी झाली आहे. राजूच्या नाजूक स्थितीकडे पाहता कुटुंबासोबतच अनेकजण चिंतेत आहेत. तो एम्समध्ये बरा होण्याची कुटुंबीय वाट पाहत आहेत. राजूची पत्नी शिखादेखील सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपस्थित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मदतीचा हात
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तवची पत्नी शिखा हिच्याशी फोनवरून चर्चा केली. राजूला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मोदींनी एम्सच्या डॉक्टरांशीही बोलून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अजय आणि युग या बाप-लेकामधील झक्कास नातं व्हिडिओतून आलं समोर, चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव
रिलीझपूर्वीच विजय-अनन्याच्या सिनेमाने केली छप्परफाड कमाई; जगभरात ‘एवढ्या’ कोटीत विकले गेले थिएटर राईट्स
बापाच्या पैशांवर जगणाऱ्या मुलींमधली नाही सारा; वर्षाकाठी छापते ‘एवढे’ कोटी, एका सिनेमासाठी घेते ३ कोटी