Friday, July 5, 2024

ऍडमिट होऊन 35 दिवस उलटले, तरीही राजू बेशुद्धच! भाऊ म्हणाला, ‘आता फक्त…’

चाहत्यांना पोट धरून हसवणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव याच्या तब्येतीबद्दल दररोज काही ना काही माहिती समोर येत आहे. त्याच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप त्याला शुद्ध आली नाहीये. राजूच्या भावाने माध्यमांशी बोलताना कॉमेडियनबद्दल ही माहिती दिली आहे.

राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) याच्या भावाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, राजूला अद्याप शुद्ध आली नाहीये. तो व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. मात्र, त्याची तब्येत स्थिर असल्याचेही त्याने सांगितले आहे. खरं तर, मागील महिन्यात म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजूला दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राजूचा भाऊ दीपू श्रीवास्तव याने सांगितेल की, “राजूच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. आशा आहे की, तो लवकरच बरा होईल. राजूला रुग्णालयात दाखल करून 35 दिवस झाले आहेत. मात्र, त्याला आतापर्यंत शुद्ध आली नाहीये. डॉक्टर म्हणाले आहेत की, ते पूर्ण लक्ष देत आहेत. आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज आहे.”

माध्यमांनी राजूच्या भावाला विचारले की, कुटुंबीय राजूला मुंबईच्या इतर रुग्णालयात हलवण्याचा विचार करत आहेत का? यावर दीपू म्हणाला की, “नाही, आतापर्यंत आम्ही अशी कोणतीही योजना आखली नाहीये. त्याच्यावर एम्समध्ये उपचार होतील. तो बरा झाल्यानंतर आम्ही त्याला घरी घेऊन जाऊ. आम्हाला डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे.”

राजूबद्दल थोडक्यात
राजू श्रीवास्तव याच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 1980च्या दशकात मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले होते. त्याने ‘मैंने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या’ यांसारख्या अनेक सिनेमात सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्याला 2005 साली आलेल्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या भागानंतर अमाप प्रसिद्धी मिळाली. सध्या तो चित्रपट विकास परिषद उत्तर प्रदेशचा अध्यक्ष आहे.

राजूच्या तब्येतीवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तो बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच, चाहतेही सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशात राजू शुद्धीवर केव्हा येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ढाई किलो’चा हात दाखवत सनीने लावला निर्मात्याला चुना, 20 वर्षांनंतर अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप
‘मला माहित आहे त्याचा खून झालाय’, सुशांत सिंग राजपूत मृत्यूवर फैसल खानचे मोठे वक्तव्य
‘या’ दिग्गज दिग्दर्शकाला सलमानसोबत करायचा आहे अ‍ॅक्शन चित्रपट, चौथ्यांदा करणार एकत्र काम

हे देखील वाचा