Thursday, September 17, 2026
Home बॉलीवूड ‘ढाई किलो’चा हात दाखवत सनीने लावला निर्मात्याला चुना, 20 वर्षांनंतर अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप

‘ढाई किलो’चा हात दाखवत सनीने लावला निर्मात्याला चुना, 20 वर्षांनंतर अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप

बॉलिवूडमधील पावरफुल अभिनेत्यांबद्दल जेव्हाही चर्चा होते, तेव्हा त्यामध्ये सनी देओल या नावाचा आवर्जुन समावेश होतो. सनीने प्रेक्षकांमध्ये ऍक्शन हिरो म्हणून ओळख मिळवली आहे. तो त्याच्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, सनीवर आता धक्कादायक आरोप लावण्यात आलाय. हा आरोप बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध निर्मात्याने लावलाय.

प्रसिद्ध निर्माते सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याच्यावर फसवणुकीचा आरोप लावलाय. त्यांचा असा आरोप आहे की, सनी देओलने त्यांच्याकडून जवळपास 20 वर्षांपूर्वी एका सिनेमासाठी मार्केट रेटपेक्षा जास्त मानधन घेतले होते. त्यानंतर मात्र त्याने सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. याव्यतिरिक्त त्याने सिनेमासाठी घेतलेले पैसेही परत केले नाहीत.

एका मुलाखतीदरम्यान सुनील यांनी सांगितले की, सिनेमाच्या शूटिंगवेळी सनी मध्येच लंडनला गेला होता आणि तो परतलाच नाही. त्यामुळे त्यांना योग्यप्रकारे शेवट केल्याशिवाय सिनेमा प्रदर्शित करावा लागला होता. ते म्हणाले की, “सनीने मला वचन देऊन भाग पाडले होते की, मी त्याची कारकीर्द पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यात मदत करेल. त्यात मी माझ्या एक वर्षाचे योगदानही दिले. या वचनासह तो माझ्या पुढच्या सिनेमात काम करेल, जो त्याने साईनही केला होता. मात्र, त्याने त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत.”

दर्शन यांनी पुढे सांगितले की, “सनी देओलने या सिनेमाच्या विषयावर आणखी काम करावे लागेल असे सांगून सिनेमा नाकारला.” सुनील यांना वाटले की, कदाचित सनीचा हेतू योग्य नव्हता. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुनील ज्या सिनेमाबद्दल बोलत आहे, तो सिनेमा दुसरा तिसरा कोणता नसून ‘जानवर’ आहे. या सिनेमात पुढे अक्षय कुमार (Akshay Kumar) याने काम केले. हा सिनेमा चांगलाच गाजला होता.

सनी देओलच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या सिनेमात दिसणार आहे. आर बाल्की यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दुलकर सलमान आणि पूजा भट्ट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याव्यतिरिक्त सनी ‘गदर 2’ सिनेमातही काम करत आहे. या सिनेमात तो पुन्हा एकदा अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यासोबत झळकणार आहे. सनी आणि अमिषाचा ‘गदर’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला माहित आहे त्याचा खून झालाय’, सुशांत सिंग राजपूत मृत्यूवर फैसल खानचे मोठे वक्तव्य
‘या’ दिग्गज दिग्दर्शकाला सलमानसोबत करायचा आहे अ‍ॅक्शन चित्रपट, चौथ्यांदा करणार एकत्र काम
बापरे बाप! दुसऱ्यासोबत रोमान्स करताना सापडली राखी, संतापलेल्या आदिलने केली मारहाण

हे देखील वाचा