Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड ‘दुःखी लोकांना हसण्याची दैवी देणगी देणाऱ्या सिकंदरला अखेरचा सलाम’, राजूंच्या निधनावर दिग्गज कवी भावूक

‘दुःखी लोकांना हसण्याची दैवी देणगी देणाऱ्या सिकंदरला अखेरचा सलाम’, राजूंच्या निधनावर दिग्गज कवी भावूक

अभिनेते राजू श्रीवास्तव यांच्या रूपात कॉमेडी जगतातील एक लखलखता तारा निखळला आहे. त्यांच्या निधनानंतरही चाहत्यांना विश्वास बसत नाहीये की, राजू आज आपल्यात नाहीयेत. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला असून मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील 41 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजूंनी बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) जगाचा निरोप घेतला. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. यामध्ये कवी आणि राजकारणी कुमार विश्वास यांचाही समावेश आहे.

कुमार विश्वास यांनी राजूंना वाहिली श्रद्धांजली
कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर (Raju Srivastava Death) दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “राजूभाईंनी अखेर देवलोकाच्या दु:खाशी लढण्यासाठी सांसारिक प्रवासातून ब्रेक घेतला. संघर्षाच्या दिवसांपासून ते यशाच्या शिखरापर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील शेकडो आठवणी डोळ्यांसमोर तरळत आहेत. दुःखी लोकांना हसण्याची दैवी देणगी देणाऱ्या सिकंदरला अखेरचा सलाम.”

मागील महिन्यात केले होते रुग्णालयात दाखल
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना मागील 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना लगेच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते मागील 41 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर त्यांनी 21 सप्टेंबर रोजी 10 वाजून 20 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वजण भावूक झाले आहे.

राजू श्रीवास्तव यांचे सिनेमे
आपल्या कॉमेडीने राजू यांनी असंख्य चाहतावर्ग कमावला आहे. कॉमेडीशिवाय त्यांनी अनेक सिनेमांमध्ये अभिनयही साकारला आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये ‘बॉम्बे टू गोवा’, ‘मैंने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘मैं प्रेम की दिवानी हूं’, ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’, ‘बारूद’, ‘वाह! तेरा क्या कहना’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! स्वातंत्र्यसैनिकाच्या बायोपिकमधून मांजरेकर बाहेर, दिग्दर्शन न करण्यामागील कारण आले समोर
राजूंच्या निधनानंतर पूर्ण खचून गेलीये पत्नी; म्हणाली, ‘मी बोलण्याच्या स्थितीत नाही, एवढंच सांगते…’
ट्रक क्लिनर म्हणून सुरुवात ते पहिली कमाई 50 रुपये , असा होता राजू श्रीवास्तव यांचा संघर्ष

हे देखील वाचा