लोकप्रिय कॉमेडी अभिनेता राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना लगेच एम्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी 41 दिवस मृत्यूशी झुंज दिली. शेवटी त्यांनी बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या बऱ्याच चाचण्या केल्या होत्या. त्यामध्ये डॉक्टरांना एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समजली होती.
राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava) यांचे रिपोर्ट समोर आल्यावर सगळ्यांनाच धक्का बसेल, असे कारण समोर आले होते. त्यांच्या एमआरआई रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, त्यांच्या डोक्यातील नसा दबलेल्या आहेत. अभिनेत्याची अशी परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांच्या घरच्यांना आधीच कळवले की, राजू यांना ठीक होण्यासाठी 10 दिवसांपेक्षाही जास्त दिवस लागू शकतात. याची पूर्ण माहिती श्रीवास्तव यांचा छोटा भाऊ दीपू याने दिली होती. राजू श्रीवास्तव हे आपल्या अखेरच्या श्वासापर्यत लढत राहिले होते. मात्र, त्यांच्या शरीराने त्यांना साथ दिली नाही.
राजू हे आधीच हृदय विकाराने ग्रस्त होते, त्यांच्या हृदयात आधीच 9 स्टेंट टाकलेले होते. यानंतर एंजियोप्लास्टी करत असताना अभिनेत्याच्या हृदय असलेल्या भागापशी 100 टक्के काळा भाग झाला होता. हृदय विकाराचे रुग्ण असलेले राजू श्रीवास्तव यांची दोन वेळा एंजियोप्लास्टीही केली होती. आधीच 10 ऑगस्ट या दिवशी अभिनेत्याची तिसऱ्यावेळेस एंजियोप्लास्टी ही चाचणी झाली होती. राजू श्रीवास्तव हे 41 दिवसांपर्यत व्हेंटिलेटरवर होते, आणि त्यांच्यावर उपचार केले जात होते.
View this post on Instagram
त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. 1988 मध्ये ‘मैने प्यार किया’, ‘तेजाब’, आणि ‘बाजीगर’ सारख्या चित्रपटामध्ये आपली भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांनी सलमान खान (Salman Khan), ऋतिक रोशन (Hrithik Roshan), शाहरुख खान (Sharukh Khan) यांसारख्या मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. राजू श्रीवास्तव यांची ‘गजोधर भैय्या’ (Gajodhar Bhaiya) ही भूमिका फारच गाजली होती, त्यामुळे त्यांना काही लोक ‘गजोधर’ या नावानेच बोलवत होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्री दु:खात असून कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रणबीरने खोलले गरोदर पत्नी आलियासोबतचे बेडरूम सिक्रेट्स! म्हणाला, ‘रोज रात्री आम्ही दोघं…’
सर्वांचं सोडा, थेट पती सैफसमोरच करीनाने केले होते एक्स बॉयफ्रेंड शाहिदला किस, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे भोजपुरी कलाकारही भावूक; श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘जगाला हसवणारे कायमचे शांत झाले’