हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा अंतरा श्रीवास्तव (Atara Srivastav) फक्त 12 वर्षांची होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, एके दिवशी अंतरा आणि तिची आई शिखा श्रीवास्तव घरात एकट्या होत्या. त्याचवेळी काही चोरटे त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी शिखा यांच्याकडे बंदूक दाखवली. अशा परिस्थितीत अंतरा हिने योग्य वेळी आपले शौर्या दाखवून आपल्या आईचे प्राण तर वाचवलेच पण त्या चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
जेव्हा चोर त्याच्या घरात घुसले तेव्हा अंतरा लगेच दुसऱ्या खोलीत गेली आणि तिथे तिने तिचे वडील आणि पोलिसांना फोन करून सर्व माहिती दिली. एवढेच नाही तर तिने बेडरूमच्या खिडकीतून त्यांच्या इमारतीच्या वॉचमनला बोलावले. त्यानंतर पोलिसांनी तेथे येऊन चोरट्यांना पकडले आणि त्यामुळे अंतरा आणि तिची आई या दोघींचे प्राण वाचले.
या शौर्याबद्दल अंतरा श्रीवास्तवला 2006 मध्ये भारत सरकारने शौर्य पुरस्काराने सन्मानित केले. तिला हा पुरस्कार देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यासोबतच अंतराने देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचीही भेट घेतली होती.
अंतराविषयी बाेलायचे झाले तर, त्या देखील वडिलांसारखे मनाेरजंन क्षेत्रात काम करतात. त्या व्यवसायाने डायरेक्टर आहे. ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ हे त्यांची दमदार चित्रपट आहे. तर राजू श्रीवास्व यांचा मुलगा सितार वादक आहे. वडिलांबराेबर त्यांची विशेष बाॅन्डिंग हाेती. त्याला वडिलांसाेबत अनेकदा त्यांच्या शाेमध्ये बघितलं गेलं आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजूंच्या निधनामुळे भोजपुरी कलाकारही भावूक; श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘जगाला हसवणारे कायमचे शांत झाले’
‘पनीर, लोणचं, सलाड, थोडासा बच्चन सगळे एकटे पडले’, राजूंच्या निधनानंतर हेमांगीची भावूक पोस्ट व्हायरल
अभिनेते महेश ठाकूर यांनी पोलिसांकडे केली तक्रार; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप