अभिनेते महेश ठाकूर यांनी पोलिसांकडे केली तक्रार; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

0
89
mahesh
photo courtesy: Instagram/official_mahesh_thakur

मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेते महेश ठाकूर (Mahesh Thakur) हे त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. पण सध्या ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. महेश यांनी मयंक गोयल नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे. 5 कोटी 43 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप महेश यांनी मयंक गोयल या व्यक्तीवर केला आहे. महेश यांनी मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये मयंक विरोधात तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण?
महेश यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा मालमत्तेचा वाद सुरू असून या संदर्भात न्यायालयीन कामकाज, पुरावे आणि कागदपत्रांच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली. महेश यांनी तक्रारीवरून पोलिसांनी IPC कलम 420 आणि 406 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 5 कोटी 43 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप महेश यांनी मयंवर केला आहे.

महेश ठाकूर यांचे चित्रपट आणि मालिका
हम साथ साथ हैं , हम हो गये आप के, तुम वीर हो , सत्या 2, जय हो, करले प्यार करले, हमको दीवाना कर गए, आकाश वाणी या चित्रपटांमध्ये महेश यांनी काम केलं आहे. आशिकी 2 या चित्रपटातील महेश यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच ससुराल गेंदा फूल, ये मेरी लाईफ है, स्पर्श, कुद्रत, लक लक की बात है या मालिकांमध्ये महेश ठाकूर यांनी काम केलं. मालिका आणि चित्रपटांमधील महेश यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. तसेच महेश हे लेखक देखील आहेत. त्यांनी I-Quotes नावाचे पुस्तक लिहिले आहे जे 2021 च्या सुरुवातीला प्रकाशित झाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजूंच्या निधनानंतर ‘या’ स्टँडअप कॉमेडियनची घसरली जीभ! म्हणाला, ‘बरं झालं आम्ही सुटलो…’

कॉमेडी ड्रामा ‘नजर अंदाज’ चित्रपटाचा पोस्टर रिलीझ, ‘या’ दिवशी थेटरमध्ये होणार रिलीझ
नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं जान्हवीचं सौंदर्य, पाहून व्हाल फिदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here