Saturday, June 29, 2024

शोकसभेत राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या; म्हणाल्या, ‘आयुष्यच संपलं…’

देशातील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव  यांचे  21 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी जीममध्ये कसरत करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. 41 दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी अखेर आपल्या जीवनाचा त्याग केला. 

आज जुहू येथील इस्कॉन मंदिराच्या सभागृहात दिवंगत राजू श्रीवास्तव ( Raju Shrivastv) यांच्या आत्माच्या शांतीसाठी लाेक प्रार्थना करत हाेतं. यावेळी राजू श्रीवास्तव यांच्यासाेबत काम करणारे सर्व कलाकार उपस्थित हाेतं. यामध्ये दिग्दर्शक अब्बास मस्तान, अनिल शर्मा, मनोज शर्मा, महेंद्र धारीवाल, अभिनेता अरुण गोविल, शैलेश लोढ़ा, जॉनी लीवर, बिंदु दारा सिंह, के के मेनन, अंजान श्रीवास्तव,नील नितिन मुकेश,अली खान, रमेश गोयल, लिलिपुट, कपिल शर्मा, राजू श्रेष्ठ, गायक अरविंदर सिंह, राम शंकर, अभिजीत भट्टाचार्य,नितिन मुकेश,गायिका मधु श्री, एक्शन डायरेक्टर टीनू वर्मा, श्याम कौशल,राजू श्रीवास्तव यांचे साेबती कलाकार सुनील पाल, एहसान कुरैशी, किकू शारदा,  सुगंधा मिश्रा, लेखक विकास कौशिक यांच्यासह अनेक कलाकारांनी राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव, मुलगा आयुष्मान आणि मुलगी अंतरा श्रीवास्तव यांचे या दु:खा प्रसंगी सात्वन केलं.

राजू श्रीवास्तव यांचे वडिल रमेश चंद्र श्रीवास्तव कवी हाेते. मात्र, लाेक त्यांना प्रेमाने काका म्हणत असे. राजू श्रीवास्तव यांनी हसत – खेळत बालपण घालवले आणि विनाेदालाच आपलं करिअर बनवले. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी भावूकहून म्हणाली,  “ते संपूर्ण जगाला प्रिय हाेतं. किती तरी अनाेळखी लाेक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा हाेण्यासाठी  प्राथना करत हाेतं. डाॅक्टरने देखील खूप प्रयत्न केलं मात्र वाचवू शकले नाही. जिथं पण ते असेल हसवत असेल. परंतु माझे तर आयुष्य गेले. दु:खाच्या या वेळी सर्व सात्वन करत आहे.”

राजू यांच्या कुटुंबाविषयी बाेलायचे झाले तर, त्यांची मुलगी अंतरा देखील वडिलांसारखी मनाेरजंन क्षेत्रात काम करते. ती व्यवसायाने डायरेक्टर आहे. ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ हे त्यांची दमदार चित्रपट आहे. तर राजू श्रीवास्व यांचा मुलगा सितार वादक आहे. वडिलांबराेबर त्यांची विशेष बाॅन्डिंग हाेती. त्याला वडिलांसाेबत अनेकदा त्यांच्या शाेमध्ये बघितलं गेलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘खतरों के खिलाड़ी 12’ अभिनेत्रीचा खतरनाक स्टंट पाहून पूजा हेगडेची उडाली भितीने गाळण, व्हिडिओ व्हायरल

‘राहायला घर नव्हते, उपाशी राहुन काढले दिवस…’, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला संघर्षमय प्रवास

हे देखील वाचा