Friday, March 29, 2024

‘राहायला घर नव्हते, उपाशी राहुन काढले दिवस…’, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला संघर्षमय प्रवास

श्रेया धन्वंतरीचा नुकताच ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता तिनं आयुष्यात बराच काळ  संघर्ष केल्याचे उघड केले आहे. श्रेया धन्वंतरी तिच्या आई-वडिलांसोबत दुबई, बहारीन आणि कतारलाही गेली होती. त्यानंतर ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी भारतात परतली. मात्र, तिला अभिनेत्री व्हायचे होते. त्यामुळे तिने मनोरंजन क्षेत्रात लक्ष केंद्रित केले.

श्रेया धन्वंतरीने(Shreya Dhanwanthary) एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात आलेल्या अडचणी विषयी खुलासा केला ती म्हणते, “चित्रपटांमध्ये काम करणे हे माझे ध्येय होते. हे सीक्रेट मी माझ्याजवळ लपवून ठेवले होते. आता मला विश्वास बसत नाही की, मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते.” ती पुढे म्हणाली, “मी हे कसं केलं हे तुम्ही मला विचारू नका. मी येथे कसे राहिले, मी इथं अजूनही रहात आहे. माझ्याकडे पैसे नव्हते. मी बेघर होणार होते. मला उपाशी राहावे लागले. मला माहित नाही मी कसं केले. मला वाटते की मी आहे थोडी सायको आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

श्रेया धन्वंतरीने मिस इंडिया 2008 मध्ये देखील सहभाग घेतला होता. मिस इंडियामध्ये ती फायनल झाली होती. यानंतर ती तेलुगु चित्रपट ‘जोश’ मध्ये देखील दिसली होती, त्यानंतर तिने 10 वर्षांनी बॉलिवूड चित्रपटात पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- 
अर्रर्र! अली- रिचाच्या लग्नात फोन घेऊन जाण्यास परवानगी, पण ‘ही’ अट करावी लागेल मान्य
‘ब्रह्मास्त्र’च्या डायरेक्टरने थेट ‘आयरन मॅन’शी केली शाहरुखची तुलना, पण का? घ्या जाणून

हे देखील वाचा