छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय ‘द कपिल शर्मा‘ शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी शाेमध्ये काही नवीन चेहरे प्रेक्षकांचे मनाेरंजन करणार आहे. साेशल मीडियावर चाहते निर्मात्यांपासून कृष्णा अभिषेक, भारती आणि अली असगर यांना शाेमध्ये परत आणण्याचा आग्रह करत आहे. अशातच कपिलच्या दादीची भूमिका साकारणारा अली असगरने (Ali asagar) कपिल आणि त्याच्या रिलेशनवर माेकळेपणाने बोलली.
माध्यमांशी बाेलताना अली असगरने सांगितले की, “जेव्हापासून मी कपिल शर्माचा शाे साेडला आहे. तेव्हापासून आमच्यात काही संवाद नाही. आम्ही एकमेकांचे काॅल मिस करत आहाेत, त्यानंतर आमची कधीच भेट झाली नाही. यावर त्याला विचारण्यात आले की, ताे शाेमध्ये कधी परतणार? अली म्हणाला, “गेल्या 5 वर्षांपासून माझ्या आणि कपिलमध्ये काहीही संवाद नाही आणि ना कधी आम्ही भेटलाे मग मी तुम्हाला कसं सांगू की, त्याच्या शाेमध्ये मी परतणार की नाही.” अलीने शाे का साेडला असे विचारण्यात आल्यावर ताे म्हणाला, “मला अडचण फक्त माझ्या कॅरेक्टरला घेऊन हाेती. याव्यतिरिक्त अजून दुसरे कुठलेही कारण नाही. असं काहीही घडलं नाही की, मी त्याच्यासाेबत पुन्हा काम करणार नाही. ज्यादिवशी काही चांगले हाेईल, त्यादिवशी आम्ही पुन्हा परत येऊ आता हे वेळच सांगू शकेल.”
Ali Asgar ki beti ke pyaare shabdon ne kar diya unki aankhon ko nam. ????
Dekhiye #JhalakDikhhlaJaa har Sat-Sun, raat 8 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot.@PypAyurved@MadhuriDixit #NoraFatehi @karanjohar @ManishPaul03@kingaliasgar pic.twitter.com/CqrMJxItCg
— ColorsTV (@ColorsTV) September 16, 2022
सध्या अली असगर ‘झलक दिखला जा 10’ शाेचा कंटेस्टेंट आहे. शाे जिंकण्यासाठी ते जीवताेड मेहनत करत आहे. झलक दिखला जा 10 चे परिक्षक नोरा फतेही, करण जोहर आणि माधुरी दीक्षित (Madhuri dixit) आहे. 2016 साली कपिल शर्माने आपल्या टीमसह साेनी टीव्हीवर काॅमेडी शाे सुरु केला. मात्र, एका वर्षानंतर काही मतभेदांमुळे अली असगर, सुनील ग्रोवर, भारती सिंगसह (bharati singh) अनेक कलाकांरानी हा शाे साेडला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा :
आलिया भट्टचं डोहाळे जेवण! समोर आली पाहुण्याची यादी, पाहा कोणाकोणाला दिले निमंत्रण
‘डान्स आणि एक्शन सीन करु नकोस…’ ऋतिक रोशनला डॉक्टरांनी दिला सल्ला, अभिनेत्याचे उत्तर ऐकून कराल कौतुक
‘तुला दोन आई आहेत…’, म्हणत अली असगरच्या मुलांची उडवली होती खिल्ली, किस्सा ऐकून तुम्हीही व्हाल भावूक