मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवलेले प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर अडचणीत सापडले आहेत. त्यांचा ‘वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमामुळे मांजरेकरांविरोधात मुंबई न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या सिनेमात महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात क्षत्रिय मराठा सेवेने ही तक्रार केली आहे. तसेच महेश मांजरेकरांविरुद्धही क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने तक्रार केली आहे. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम २९२ (अश्लील सामग्रीची विक्री), २९५ (अश्लील कृत्ये किंवा शब्दांसाठी शिक्षा), ३४ अंतर्गत मांजरेकरांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मांजरेकरांव्यतिरिक्त नरेंद्र, श्रेयांश हिरावत आणि ‘वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ सिनेमाचे निर्माते एनएच स्टुडिओज यांनाही आरोपी केले आहे.
‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा सिनेमा १४ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या कास्टबद्दल बोलायचं झालं, तर त्यात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर आणि ईशा दिवेकर यांचा समावेश आहे.
हेही वाचा-