×

गौतमी देशपांडेच्या घरात झालं चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही ‘माझा होशील ना’ आणि ‘सारे तुझ्याच साठी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आणि आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचली. ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. गौतमी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अशातच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करत आहे. तिने चाहत्यांसोबत त्या चिमुकल्या पाहुण्यांची ओळखही करून दिली आहे.

गौतमी देशपांडे हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘माझा होशील ना’, ‘सारे तुझ्याच साठी’ या तिच्या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या फार पसंतीस पडल्या. या दोन्ही मालिकांतून ती घराघरात पोहोचली. गौतमी सध्या तरुण पिढीला आपल्या प्रेमात पाडले आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सध्या तिने तिच्या घरात नवीन आलेल्या चिमुकल्या पाहुण्याचे स्वागत केले आहे.

तिने सोशल मीडिया वरती व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या घरात आलेल्या चिमुकल्या पाहुण्याचं ती स्वागत करताना दिसत. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिल आहे, “स्वागत आहे लहानबाळाचं.”

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

हा नवीन पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क एक कुत्र्याचं गोंडस पिल्लू आहे. या छोट्याशा कुत्र्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या गोंडस पिल्लाचं स्वागत तिने तिच्या घरात केलं आणि त्याचाच व्हिडिओ तिने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तारे जमीन पर’ सिनेमातील गाणं ऐकू येत आहे.

हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. त्यांनी देखील गोंडस पिल्लाचं स्वागत करून, व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा :

Latest Post