Wednesday, June 26, 2024

सीनच इतका इंटीमेट की, भावनेच्या भरात वाहवत गेला रणदीप हुड्डा; पुढं अभिनेत्रीसोबत जे घडलं, ते…

ही गोष्ट आहे २०१६ ची जेव्हा ‘दो लफ्जो मे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दीपक तिजोरी (deepak tijori) यांच्या या चित्रपटात काजल अग्रवाल (kajal aggarwal) आणि रणदीप हुड्डा (randeep hudda) मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान रणदीप हुड्डाने अचानक कॅमेऱ्यासमोर काजल अग्रवालला किस केले. काजल अग्रवालला धक्काच बसला कारण तिला स्क्रिप्टमध्ये अशा कोणत्याही ‘किस’ची माहिती नव्हती. सीन कट झाल्यानंतर काजलला राग आला आणि ती एका बाजूला जाऊन रडू लागली. तिने आपल्या चित्रपटात असा कोणताही सीन यापूर्वी कधीही केला नव्हता. त्या काळात ती साऊथची सुपरस्टार होती. तिने तिचा को-स्टार रणदीप हुड्डाला काहीही सांगितले नाही आणि रडतच राहिली. त्यानंतर दीपक तिजोरी तिच्याशी बोलण्यासाठी गेले. काजलने त्याला इतकंच सांगितलं की हा सीन डिलीट कर.

तिजोरीने तिला समजावून सांगितले की, खरे तर हा सीन चित्रपटाची मागणी आहे. या सीन दरम्यान काजल आणि रणदीप हुड्डा इतके इंटिमेट होतात की तिथे किसिंग सीन आवश्यक होता. दीपक तिजोरीला माहित होते की, काजल हा सीन करणार नाही कारण काजलने दीपकला आधीच सांगितले होते की, ती स्क्रीनवर किसिंग सीन करत नाही. किसिंग सीनमुळे त्याचे साऊथ फिल्मी करिअर उद्ध्वस्त होईल. त्यामुळेच दीपकने काजलला या सीनबद्दल आधी सांगितले नाही. शूटिंग करताना काजल सुरळीत चालेल, असं तिला वाटत होतं. पण काजलला धक्काच बसला.

दीपकने काजलशी बोलून तिला चित्रपटात हा सीन का आवश्यक आहे हे समजावून सांगितले. मग हळू हळू काजलला प्रकरण समजले. हा सीन पुन्हा शूट करण्यात आला आणि यावेळी काजलने या सीनमध्ये आपला संपूर्ण जीव ओतला. शेवटी सर्व काही ठीक झाले. अशा प्रकारे काजलने तिचा पहिला ऑनस्क्रीन किसिंग सीन दिला. त्यादरम्यान या किसिंग सीनवर मीडियामध्ये बरेच काही लिहिले गेले.

असा सीन शूट करायचा आहे हे काजलला माहीत होतं पण ती सतत नकार देत होती. ती तयार नव्हती. दक्षिणेतील तिच्या प्रतिमेची तिला काळजी वाटत होती. पण दीपकला न सांगता रणदीपसोबत लिपलॉक सीन शूट झाला तेव्हा काजलही काही बोलली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

कामाच्या स्पर्धेपेक्षाही मैत्री महत्वाची! ‘हे’ आहेत मराठीतील घट्ट कलाकार मित्र

अमिषासोबत फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखलं का? जगातल्या हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना

फक्त लढ म्हणा! ‘मिर्झापूर ३’मध्ये पाहायला मिळणार गोलू पंडितची दमदार भूमिका, जिममध्ये करतेय बॉक्सिंग प्रॅक्टिस

हे देखील वाचा