प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या चांगलीच अडचणीत आली आहे. श्वेताने एका वेबसिरीजच्या प्रमोशन दरम्यान केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (FIR File Against Shweta Tiwari)
श्वेता तिवारीच्या विरोधात थेट मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांच्याकडूनच तक्रार दाखल करण्यात आलीये. नरोत्तम मिश्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे की, ‘मी तो व्हिडीओ स्वत:पाहिलेला आहे. तसेच श्वेता तिवारी बोलत असल्याचे ऐकले सुध्दा असून मी त्याचा विरोध करतो. त्यामुळे भोपाळच्या पोलिस कमिशनर यांनी या प्रकरणात अधिक लक्ष घालून चौकशी करावी. त्यानंतर श्वेता तिवारीवरीत कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी 24 तासाच्या आत करावी,’ असे मिश्रा यांनी पोलिसांना सांगितले. (Controversial Statement FIR File Against Shweta Tiwari)
अधिक वाचा – ‘माझ्या ब्राची साईज…’, अभिनेत्री श्वेता तिवारीची घसरली जीभ, कार्यक्रमातच केले वादग्रस्त विधान
एक्ट्रेस #ShwetaTiwari का भोपाल में दिया गया बयान निंदनीय है।
भोपाल पुलिस कमिश्नर मकरंद देउस्कर को 24 घंटे में तथ्यों और संदर्भ की जांचकर रिपोर्ट देने का निर्देश दिया है, जिसके आधार पर निर्णय लिया जाएगा।@DGP_MP pic.twitter.com/76IzK9lqDt
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) January 27, 2022
प्रकरण काय?
श्वेता तिवारी तिच्या आगामी ‘शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळ येथे गेली होती. या कार्यक्रमादरम्यान सर्व प्रकार घडला आहे. श्वेता तिवारीने तेव्हा बोलताना ‘माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं वक्तव्य केलं होतं.
प्रत्यक्षात काय घडलं?
श्वेताने जेव्हा हे वक्तव्य केले, तेव्हा यावेळी तिच्या सोबत अभिनेता सौरभ जैन हासुद्धा होता. सौरभने अनेक पौराणिक भूमिका साकारल्या आहेत. त्याने अनेक मालिकांमध्ये देवाच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्याला प्रश्न विचारण्यात आला होता, देवाच्या भूमिकेपासून सरळ ब्रा फिटरची भूमिका? यावरच बोलताना श्वेता म्हणाली होती, “हा याच देवाकडून आम्ही फिटिंग करून घेत आहोत”.