Thursday, August 7, 2025
Home वेबसिरीज ‘या’ वेबसिरीजमधील सीन्स, दृशांमुळे उद्भवले वाद, काही प्रकरणं तर गेले थेट पोलिसांपर्यंत

‘या’ वेबसिरीजमधील सीन्स, दृशांमुळे उद्भवले वाद, काही प्रकरणं तर गेले थेट पोलिसांपर्यंत

कोरोनाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि संपूर्ण जग एकसाथ थांबले. सर्वांना मोठ्या स्वरूपाच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण सार्वजनिक जीवनावर जायबंदी झाली आणि प्रत्येक व्यक्ती घराच्या चार भिंतीत कैद झाला. त्यामुळे प्रत्येकाला मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय शोधावे लागले. यातच सर्वात मोठा पर्याय बनून समोर आला ओटीटी प्लॅटफॉर्म. सर्वच प्रकारचे, सर्व भाषांमधील, सर्व देशांमधील कलाकृती, सिनेमे, वेबसिरीज याच माध्यमातून प्रेक्षकांसमोर येऊ लागल्या. लॉकडाऊन आधी खूप कमी किंबहुना मोजक्या लोकांना माहित असणारे हे माध्यम लॉकडाऊनमुळे सर्वच लोकांना माहित झाले.

आता तर ओटीटी हे लोकांसाठी आवश्यक गरज बनले आहे. विविध ओटीटी माध्यमातून घरबसल्या पाहायला मिळणारे सिनेमे, वेबसिरीज म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा हक्काचा आणि सतत उपलब्ध असणारा पर्याय बनला. या माध्यमाची क्रेझ पाहून बॉलिवूडवरील मोठमोठे कलाकार त्याच्या प्रेमात पडले आणि या माध्यमाकडे वळाले. कोरोनाच्या काळात अनेक वेबसिरीज रसिकांच्या भेटीला आल्या, मात्र यातल्या बऱ्याच वेबसिरीजला मोठ्या प्रमाणावर वादाला तोंड द्यावे लागले. ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या काही वेबसिरीजमधील काही सीन्स, संवाद यांमुळे मोठा वादंग उफाळला होता. मोठे मोर्चे, सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग, पोलीस तक्रार आदी अनेक गोष्टींना वेबसिरिजला सामोरे जावे लागले. पाहूया अशाच काही वादात सापडलेल्या वेबसिरीज.

तांडव :
सैफ अली खानची अतिशय चर्चेत असणार ही वेबसिरीज लोकांना प्रचंड आवडली. पण या वेबसिरीजमध्ये राम, शंकर आणि नारद यांचा अपमान केला गेल्याचा आरोप सिरीजवर झाला आणि मोठा वाद निर्माण झाला. यामुळे कलाकारांवर खासकरून सैफ अली खानवर पोलीस तक्रार दाखल केली गेली. त्यानंतर सिरीजमधील सर्व कलाकरांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले.

मिर्जापूर :
पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा यांची ‘मिर्जापूर’ ही सिरीज दोन भागांमध्ये प्रदर्शित झाली. ही वेबसिरीज तुफान हिट झाली. या सिरीजमुळे ‘मिर्जापूर’ला बदनाम केल्याचा आरोप तर लागला शिवाय या सिरीजमध्ये बऱ्यापैकी अपशब्द वापरले गेले. त्यामुळे लोकांनी सिरीज विरोधात पोलिसनमध्ये तक्रारी देखील दाखल केल्या होत्या.

आश्रम :
बॉबी देवोलला पुन्हा एकदा यशस्वी चव चाखायला देणारी आणि बॉबीला खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून यश मिळवून देणारी ही सिरीज देखील तुफान हिट झाली. या सिरीजमध्ये एक ढोंगी बाबाची गोष्ट दाखवण्यात आली. या सिरीजवर धार्मिक भावना दुखवण्याचा आरोप लावण्यात आला. या सिरिजला बॅन कण्याची मागणी देखील केली गेली.

लीला :
दीपा मेहता दिग्दर्शित लीला ही सिरीज देखील वादांमध्ये अडकली होती. यात डिस्टोपियन भारतचे जग दाखवले गेले होते. यात धार्मिक कट्टरपंथ मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आला होता. या शोवर अँटी हिंदू आणि अँटी नॅशनल होण्याचा आरोप झाला.

गंदी बात :
ऑल्ट बालाजीच्या या वेबसिरीजचे अनेक भाग आतापर्यंत आले आहेत. या वेबसिरीजमध्ये कलाकरांना अतिशय बोल्डरूपात दाखवण्यात आले होते. या सिरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर मादक कंटेन्ट दाखवण्यात आला होता. त्यामुळे ही सिरीज बॅन करण्याची मागणी झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा