Friday, July 5, 2024

धक्कादायक! कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीच्या परिवारावर आली पंचांग, कॅलेंडर विकण्याची वेळ

२०२० हे वर्ष सुरु झाले आणि कोरोनाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात एन्ट्री घेतली, आणि आधी कधीही न अनुभवलेले, जगलेले जीवन आपण जगायला लागलो. यातच सर्व काही बंद झाल्याने असंख्य लोकांचे काम गेले आणि त्यांचे खायचे, प्यायचे हाल सुरु झाले.

तरीही पोटासाठी आणि जगण्यासाठी धडपड सुरूच होती. हार न मानता काहीही ना काही करू पैसे मिळवण्यासाठी मिळेल ते कमी लोक करत आहे. अशातच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची एक पोस्ट सध्या वायरल झाली आहे. भार्गवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यात तिने तिच्या चुलत काका आणि आत्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

भार्गवीने तिच्या पोस्ट मध्ये लिहले आहे, ” ‘माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू…… हे आहेत
श्री. चिरमुले आजोबा, कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले त्यात यांचे देखील पण अनेकांनी शिकावी अशी यांची वयाच्या ८१ तही असलेली जगण्याची जिद्द आणि लढाऊ वृत्ती….हे आजोबा आपल्या ६५ वर्षीय मूक-बधिर बहिणीसोबत सदाशिव पेठेतील एका वाड्यात रहातात. उदरनिर्वाहासाठी दोघेही बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकतात आणि रोज संध्याकाळी सदाशिव पेठेत एका स्टूलावर सर्व पदार्थ मांडून विकण्याचा प्रयत्न करतात. पण कोरोना आला आणि सोबत यांच्या आयुष्यात घेऊन आला मोठ्ठे प्रश्नचिन्ह ??? बँका चालू होत्या, चालू आहेत आजोबांची बँकेत जाऊन पदार्थ विकण्याची तयारीही आहे. पण बँकेतले कर्मचारी आजोबांना आता येऊ देत नाहीत, अर्थात स्वतःच्या आणि आजोबांच्या काळजीपोटी.. पण आता करायचे काय ? चिरमुले आज्जी आजोबा या पदार्थांसोबत कधी उदबत्ती, कधी वाती ,कधी पंचांग विकायला आणतात. आता आजोबांनी कॅलेंडर विकायला ठेवली आहेत. आपल्या सर्वांना एक आवाहन आहे. कॅलेंडर तर आपण कोठून तरी घेणारच मग आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच एका चांगल्या कामाने झाली तर ? आपण घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा आपल्यासाठी असलेलं ‘कॅलेंडर’ कोणाच्यातरी जगण्याचा आधार बनू शकेल…’ ”

मी आणि माझे कुटुंब त्यांना शक्य तितकी मदत करतच आहोत पण माझ्या पुण्यात असणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी कृपया ह्या काका आणि आत्याकडून सामान घेऊन त्यांना मदत करावी. भार्गवीने या पोस्ट सोबत एक फोटो सुद्धा टाकला असून त्यांचा पत्ता देखील दिला आहे.

भार्गवीने अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले असून ती सध्या सोनी मराठीच्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत जिजाऊ यांची व्यक्तिरेखा साकारत आहे.

हे देखील वाचा