बॉलिवूडमध्ये अनेक मुली या अभिनेत्री होण्याच्या उद्देशाने येतात आणि त्यांच्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास देखील करतात. मात्र, यातल्या मोजक्याच अभिनेत्री होतात. काही मॉडेलिंग करायला लागतात, काही वेगवेगळ्या मार्गाने लोकप्रियता मिळवतात आणि काहींच्या पदरी अपयशच येते. आजच्या घडीला या क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या कामामुळे नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीत आल्या. अशीच एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे नताशा स्टॅन्कोविक.
क्रिकेटर हार्दिक पांड्यांची बायको ही नताशाची दुसरी ओळख. नताशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेहमी ती तिचे कुटुंबासोबतचे आणि त्यांच्या मुलाचे विडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अतिशय आकर्षक असणाऱ्या नताशाला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहे.
नुकतेच नताशाने इंस्टाग्रामवर तिचे स्विमिंग पुलमधले काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये नताशाने ब्लॅक एँड व्हाइट रंगाची बिकिनी घातली असून, यात ती कमालीची हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोला फॅन्स आणि नेटकऱ्यांनी पसंतीची पोचपावती दिली आहे. आतापर्यंत तिच्या या फोटोला ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे पती हार्दिकच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने कमेंटमध्ये स्माईल विथ लव्ह तसेच लव्ह इमोजी पोस्ट केले आहेत.
नताशाचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की ती खऱ्या आयुष्यात किती ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.
मूळची सर्बियाची असणाऱ्या नताशाने २०१२ साली मुंबई गाठली आणि येथे तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तिने अनेक जाहिराती केल्या. भारतात आल्यावर तिला लक्षात आले की, इथे हिंदी भाषा येणे खूप आवश्यक आहे, म्हणून तिने हिंदी भाषा देखील शिकली. तिने छोट्या पडद्यावर विवादित शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये देखील सहभाग घेतला. सोबतच तिने अनेक चित्रपटांमधून आयटम नंबर्स करत तिच्या दमदार नृत्याची झलक देखील दाखवली. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती हार्दिक पांड्यासोबत असलेल्या अफेअरमुळे आणि लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्यामुळे. आज नताशा आणि हार्दिक यांना ११ महिन्याचा अगस्त्य नावाचा मुलगा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’