टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’


बॉलिवूडमध्ये स्टारकीड खूप लोकप्रिय असतात. यातीलच फिटनेसबाबत लोकप्रिय असलेली स्टारकीड म्हणजे जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ. कृष्णा देखील तिचा भाऊ टायगर श्रॉफप्रमाणे फिटनेस प्रेमी आहे. दिवसातील किती तरी वेळ ती जिममध्ये घालवत असते. तिच्या भावाप्रमाणेच ती देखील एकदम फिट आहे. तिचे जिममधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकांना तिच्या या फिटनेसमागील सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे. तिने सर्वांना तिच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, “माझा फिटनेस मंत्र हा नेहमीच अगदी साधा आणि प्रामाणिक आहे. तुमचे सातत्य हीच तुमच्या यशाची किल्ली आहे. तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीच्या किती जवळ जाता आणि दररोज किती प्रयत्न करता हे महत्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. मग ते दिवसातील 30 मिनिट असो किंवा 2 तास असो. पण त्यावेळी तुम्ही पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.” (Krishna Shroff reveales her fitness secret In her interview)

तिने पुढे सांगितले की, “माझा प्रत्येक दिवस हा जिमपासूनच चालू होतो. मग तो कोणताही दिवस असो किंवा त्या दिवशी काही खास असो. जिममधील माझा पहिला तास किंवा दोन तास माझ्या उर्वरित दिवसात टोन सेट करतो. मला सामर्थ्य प्रशिक्षण आवडते. वजन हलविणे हे काहीतरी सामर्थ्यवान आहे. फक्त एक कार्डिओ क्वीन म्हणून मिळवल्याक्षा एक मजबूत आणि टोन असलेले शरीर खूपच सेक्सी असते, परंतु हे माझे मत आहे.”

टायगर श्रॉफची बहिण कृष्णा ही सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते. ती नेहमीच तिचे जिममधील वर्कआऊट करताना फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडतात.

काही दिवसांपूर्वी कृष्णा तिच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चेत आली होती. तिने नुकतेच तिचा म्युझिक व्हिडिओ ‘किन्नी किन्नी वारी’ मधून पदार्पण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास

-‘गणपती बाप्पा मोरया!’ लग्नानंतर राहुल वैद्यने मंत्रमुग्ध आवाजात केली गणेशाला प्रार्थना; व्हिडिओ होतोय इंटरनेटवर व्हायरल

-तब्बल १२०० किमीचा सायकल प्रवास करत सोनू सूदला भेटायला आला चाहता; त्याचे अनवाणी पाय बघून अभिनेत्याने…


Leave A Reply

Your email address will not be published.