वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’


बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने शुक्रवारी (१६जुलै) तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवशी अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. काल सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून शुभेच्छांचा पाऊस पडत होता. वाढदिवशी दिलेल्या शुभेच्छासाठी तिने सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत. तिने तिचा एक फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत.

कॅटरिना कैफने स्विमिंग पूलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाचा स्विमिंग सूट परिधान केला आहे. यामध्ये तिची स्माईल आणि नैसर्गिक सौंदर्य खुलले आहे. (Katrina Kaif give thanks to people who give best wishes on her birthday with sharing photo)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद.” तिच्या या फोटोवर देखील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कॅटरिनाच्या वाढदिवशी अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या.

कॅटरिना कैफ ही मागील अनेक दिवसांपासून विक्की कौशलसोबत असलेल्या तिच्या नात्याबाबत चर्चेत आहे. पण अजूनही त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनची अधिकृत घोषणा केली नाही. यातच तिच्या वाढदिवशी कॉस्च्युम डिझायनर आणि सलमान खानचा स्टायलिश एशले रेबेलो याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Photo courtesy: Instagram/ashley_rebello

डिझायनरने ‘भारत’ या चित्रपटाच्या सेटवरील कॅटरिनाचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ती ऑनस्क्रीन लग्नाच्या पांढऱ्या गाऊनमध्ये दिसत आहे. यावर त्याने असे म्हटले आहे की, त्याला आशा आहे की, रील लाईफ वेडिंग सिक्वेंस लवकरच रियॅलिटीमध्ये बदलेल.

यावरून आता तिचे चाहते असा अंदाज लावत आहेत की, कदाचित कॅटरिना आणि विक्की लवकरच लग्न करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास

-‘गणपती बाप्पा मोरया!’ लग्नानंतर राहुल वैद्यने मंत्रमुग्ध आवाजात केली गणेशाला प्रार्थना; व्हिडिओ होतोय इंटरनेटवर व्हायरल

-तब्बल १२०० किमीचा सायकल प्रवास करत सोनू सूदला भेटायला आला चाहता; त्याचे अनवाणी पाय बघून अभिनेत्याने…


Leave A Reply

Your email address will not be published.