Saturday, June 29, 2024

विराट कोहलीने खरेदी केला किशोरदांचा बंगला! दिल्लीनंतर मुंबईत सुरू करणार ‘हा’ बिझनेस

जेव्हा-जेव्हा बॉलिवूडमधील दिग्गज गायकांबद्दल चर्चा होईल, तेव्हा-तेव्हा त्या गायकांमध्ये दिग्गज गायक किशोर कुमार यांचा उल्लेख केला जाईल. 1946 ते 1987 हा काळ त्यांनी त्यांच्या आवाजाने अक्षरश: गाजवला. यादरम्यान त्यांनी गायनासोबतच अभिनयातही हात आजमावला होता. त्यांना त्यांच्या मजेशीर भूमिकांसाठी पसंतीही मिळाली. त्यांची गाणी आणि त्यांचा अभिनय आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. अशी बातमी आहे की, भारतीय संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली याने किशोरदांचा बंगला भाड्याने घेतला आहे.

विराट बनवतोय रेस्टॉरंट
माध्यमांतील वृत्तानुसार, विराट कोहली (Virat Kohli) याने किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा जुहू येथील बंगल्याचा मोठा भाग भाड्याने घेतला आहे. विशेष म्हणजे, विराट या बंगल्याचा कायापालट करत तिथे हाय ग्रेट रेस्टॉरंट उभे करणार आहे. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, किशोर कुमार यांच्या जुहू येथील बंगल्यात मोठा बदल केला जात आहे. तसेच, येथील रेस्टॉरंट हे जवळपास तयार झाले आहे.

अमित कुमार यांचा दुजोरा
किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार (Amit Kumar) याने या वृत्ताला दुरोजा दिला आहे. अमित यांनी सांगितले की, विराट कोहली याची भेट लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमीत याच्याशी झाल्यानंतर, या गोष्टीला सुरुवात झाली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांची भेट झाली होती आणि त्यांच्यात चर्चा झाली होती. ते म्हणाले, “आम्ही विराटला 5 वर्षांसाठी ती जागा भाड्याने दिली आहे.”

किशोर कुमारांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे अमित कुमार
अनेकांना माहिती नसेल की, किशोरदा यांनी त्यांच्या आयुष्यात तब्बल 4 लग्नं केली आहेत. त्यातील लीना चंदावरकर या त्यांच्या चौथ्या पत्नी आहेत. सुमीत हा लीना यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे, अमित कुमार हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे म्हणजेच रुमा गुहा यांचे सुपूत्र आहेत. तेदेखील प्रसिद्ध गायक, अभिनेते आणि संगीत दिग्दर्शक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराटचे तिसरे रेस्टॉरंट
विराट कोहलीचे हे पहिले रेस्टॉरंट नाहीये. त्याने याची सुरुवात त्याने 2017मध्ये दिल्लीतील आरके पुरम येथून केली होती. पहिले रेस्टॉरंट दिल्लीत सुरू झाले, त्यानंतर दिल्लीतच त्याने दुसरे रेस्टॉरंट सुरू केले आहे.

थाटला अनुष्काशी संसार
विराट कोहली याने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत सन 2017मध्ये संसार थाटला होता. दोघांचेही लग्न इटलीमध्ये थाटात पार पडले होते. त्यांच्या लग्नात कुटुंबातील व्यक्तींसोबतच जवळचे मित्रही सामील झाले होते. लग्नाच्या 3 वर्षांनंतर विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले होते. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव वामिका असे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा पहिल्या भेटीतच लीना यांनी नाकारले किशोर कुमार यांचे प्रपोसल, पुढे ‘अशी’ झाली लव्हस्टोरीला सुरुवात
‘लाळ टपकेपर्यंत पान खाणे अन् धोतरवर…’, किशोर कुमारांच्या अटी ऐकून हादरले बीआर चोप्रा

हे देखील वाचा