डब्बू अंकल यांचा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन


सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे सामान्य माणूस अगदी काही तासातच प्रसिद्ध होत असतो.
मध्यप्रदेशमधील विदिशामध्ये राहणारे डब्बू अंकल तुम्हा सर्वांना लक्षात असतीलंच. आपल्या डान्सने रातोरात प्रसिद्ध झालेल्या डब्बू अंकल यांना कदाचितच कोणीतरी विसरले असेल. ‘खुदगर्ज’ या चित्रपटात त्यांनी ‘आप के आ जाने से’ या गाण्यावर जोरदार ठुमके लावले होते. त्यांचा हा डान्स पाहून सर्वांना गोविंदाची आठवण आली होती. नुकतेच पुन्हा एकदा प्रोफेसर संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू अंकल यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा डान्स व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

डब्बू अंकल यांचा पहिला डान्स व्हिडिओ पाहून केवळ सामान्य लोक नाहीतर अगदी कलाकार देखील त्यांचे चाहते झाले होते. लोक त्यांना सोशल मीडियावरील ‘डान्सिंग अंकल’ असे म्हणत होते. त्यानंतर त्यांचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता देखील त्यांचा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते त्याच्या पत्नीसोबत स्टेजवर ठुमके मारताना दिसत आहेत. (Dabbu uncle’s new dance video viral on social media)

डब्बू अंकल यांनी शेअर केलेला हा डान्स पाहून असे वाटत आहे की, हा व्हिडिओ कोरोना काळाच्या आधीचा आहे. हा व्हिडिओ आकृती डिजिटल स्टुडिओ फेसबुक चॅनेलवरून शेअर केला आहे. सात मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये गोविंदासोबत अनेक बॉलिवूड कलाकारांच्या गाण्यांवर ते डान्स करताना दिसत आहेत. या वयातही त्यांची ऊर्जा पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत.

या व्हिडिओला आतापर्यंत 40 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये डब्बू अंकल त्यांच्या पत्नीसोबत स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून तिथे खूप गर्दी झालेली दिसत आहे.

संजय श्रीवास्तव यांचे अनेक व्हिडिओ या आधी व्हायरल झाले होते. परंतु त्यातील ‘आप के आ जाने से’ हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यांनी त्यांच्या मेव्हण्याच्या लग्नात या गाण्यावर डान्स केला होता. त्यांनी एकदा सांगितले होते की, ते गोविंदा आणि मिथुन चक्रवर्तीचे चाहते आहेत आणि ते त्यांची डान्स स्टाईल कॉपी करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.