Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

सध्या मनोरंजन जगतातून एक महत्वाची बातमी समोर येत असून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2022 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.  60 आणि 70 च्या दशकात आशा पारेख यांचे नाव त्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. आपल्या काळात चित्रपटाच्या पडद्यावर राज्य करणाऱ्या आशा पारेख या सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्री होत्या.  1992 मध्ये त्यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आशा पारेख (Asha Parekh) यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरातमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. आशा पारेख यांनी 1952 सालापासून ‘आसमान’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. अभिनेत्री म्हणून आशा पारेख यांचा पहिला चित्रपट ‘दिल देके देखो’ होता, जो प्रचंड यशस्वी ठरला. जवळपास 80 चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आशा पारेख यांचे सर्वच चित्रपट खूप गाजले. ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तीसरी मंजिल’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘शिकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’ या चित्रपटांचे नाव घेतले जाते.

आशा पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या नामवंत आणि ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री आशा पारेख जी यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा पारेख जी यांचे हार्दिक अभिनंदन,” अशा शब्दात त्यांचे कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- अभिनेत्री रसिकासाठी नवरात्र आहे खूपच खास, 250 नेत्रहीन मुलींसोबत लुटला गरब्याचा आनंद
इंडियन आयडॉलवर संतापले प्रेक्षक, थेट बॉयकॉट करण्याची केली मागणी
अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल 20 वर्षे

 

हे देखील वाचा