Saturday, July 27, 2024

‘या’ चित्रपटासाठी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केले सन्मानित

भारतीय मनोरंजनविश्वातील सर्वात मोठा आणि मनाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सोहळा नुकताच मुंबईमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रेखा यांच्यापासून ते अनुपम खेर, आलिया भट्ट, वरून धवन आदी अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. मुख्य म्हणजे या सोहळ्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या नवरा बायकोच्या जोडीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच इतर अनेक कलाकारांना देखील दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या सोहळ्याचे आकर्षण ठरल्या त्या आलिया भट्ट आणि रेखा. दोघींनी एकत्र एंट्री मारली आणि मीडियाचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यामध्ये अभिनेता रणबीर कपूरला त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून हा पुरस्कार देण्यात आला तर आलिया भट्टला देखील हा पुरस्कार दिला गेला आहे. सध्या रणबीर कपूर मुंबईमध्ये नसून तो शूटिंगसाठी बाहेर आहे. यामुळे हा पुरस्कार त्याच्या वतीने आलिया भट्टनेच स्वीकारला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaaholics_)

मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार आलिया भट्टला देण्यात आलेला हा पुरस्कार तिच्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमासाठी दिल्या गेल्याचे सांगितले जात आहे. मागच्यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाला जरी सरासरी प्रतिसाद मिळाला असला, तरी आलियाच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. आलिया भट्टसाठी मागचे वर्ष अतिशय चांगले गेले. एकतर तिचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा प्रदर्शित झाला, ज्याला ठीकठाक प्रतिसाद मिळाला. नंतर राजामौली यांचा आरआरआर सिनेमाने तर रेकॉर्ड केले आणि नंतर आलेल्या ब्रह्मास्त्राने देखील चांगली कमाई केली.

दादासाहेब फाळके या पुरस्काराने ‘कांतारा’ फेम अभिनेता ऋषभ शेट्टीला देखील बेस्ट प्रॉमेसिंग एक्टर पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा