दादासाहेब फाळके पुरस्कार २०२१: अजय देवगणचा ‘तान्हाजी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर ‘या’ कलाकारांनी पटकावले सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार


दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेसृष्टीत असामान्य कामगिरी करणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान या पुरस्काराचे वाटप केले जाते.

यावर्षी देखील या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून. तसेच दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

प्रभावी आणि जिवंत अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत के.के. मेनन हे नाव प्रकर्षाने घ्यावे लागते. के.के. मेनन यांनी हिंदीसोबतच गुजराती, तमिळ आणि तेलुगु सिनेमांमधूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या के.के. मेनन यांना सिनेसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत ‘धन्यवाद’ देखील म्हटले आहे.

अशी आहे संपूर्ण पुरस्कारांची यादी

कॅटेगिरी- बेस्ट इंटरनेशनल फिल्म, विनर- पॅरासाइट
कॅटेगिरी- बेस्ट फिल्म, विनर- तान्हाजी : द अनसंग वॉरियर
कॅटेगिरी- बेस्ट डायरेक्टर, विनर-अनुराग बसु, फिल्म- लूडो
कॅटेगिरी- बेस्ट सिनेमॅटोग्राफर, विनर-जितिन हरमीत सिंग, फिल्म- खुदा हाफिज
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्टर, विनर- अक्षय कुमार, फिल्म- लक्ष्मी
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्ट्रेस, विनर- दीपिका पादुकोण, फिल्म- छपाक
कॅटेगिरी- क्रिटिक्स बेस्ट ऍक्टर, विनर- सुशांत सिंग राजपूत, फिल्म- दिल बेचारा
कॅटेगिरी- क्रिटिक्स बेस्ट ऍक्ट्रेस, विनर- कियारा आडवाणी फिल्म- गिल्टी
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्टर (सपोर्टिंग रोल), विनर- विक्रांत मैसी, फिल्म- छपाक
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्ट्रेस (सपोर्टिंग रोल, विनर- राधिका मदन, फिल्म- अंग्रेजी मीडियम
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्टर (कॉमिक रोल), विनर- कुणाल खेमू, फिल्म- लूटकेस
कॅटेगिरी- आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन इन फिल्म इंडस्ट्री, विनर- धर्मेंद्र
कॅटेगिरी- परफॉर्मर ऑफ दि ईयर, विनर- नोरा फतेही
कॅटेगिरी- फोटोग्राफर ऑफ दि ईयर, विनर- डब्बू रत्नानी
कॅटेगिरी- स्टाइल दिवा ऑफ दि ईयर, विनर- दिव्या खोसला कुमार
कॅटेगिरी- आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू लिटरेचर इन इंडियन सिनेमा, विनर- चेतन भगत
कॅटेगिरी- बेस्ट वेब सीरीज, वेब सीरिज- स्कॅम 1992
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्टर (वेब सीरीज), विनर- बॉबी देओल, वेब सीरिज- आश्रम
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्ट्रेस (वेब सीरीज), विनर- सुष्मिता सेन, फिल्म- आर्या
कॅटेगिरी- आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन इन म्यूजिक इंडस्ट्री, विनर- अदनान सामी
कॅटेगिरी- एल्बम ऑफ दि ईयर, विनर- तितलियां
कॅटेगिरी- टीवी सीरीज ऑफ दि ईयर, शो- कुंडली भाग्य
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्टर (टीवी सीरीज), विनर- धीरज धूपर, शो- नागिन ५
कॅटेगिरी- बेस्ट ऍक्ट्रेस (टीवी सीरीज), विनर- सुरभि चांदना, शो- नागिन ५

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एक-एक नावे आणि त्याखालील प्रकरणे वाचून शॉक बसेल; पाहा चंदेरी दुनियेतील धक्कादायक वास्तव

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.