भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा आणि सर्वात मोठा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award). दरवर्षी या पुरस्कारांची घोषणा केली जाते. यावर्षी देखील नुकतीच या पुरस्करांची घोषणा करण्यात आली असून, अनेक मोठ्या दिग्गज कलाकारांनी या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी या पुरस्काराने गौरवण्यात येते. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 या सोहळ्याचे आयोजन २० फेब्रुवारी रोजी मुंबईमधील ताज लँड्स एंड इथे करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातील या पुरस्कार विजेत्यांची यादी समोर आली आहे. अभिनेता रणवीर सिंगला (Ranvir Singh) ’83’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ‘मिमी’साठी क्रिती सेनन (Kriti Sanon) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराची मानकरी ठरली. या पुरस्कारांमध्ये पुष्पा सिनेमाचा चांगलाच बोलबाला दिसून आला.
Complete list of winners at Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2022
Read @ANI Story | https://t.co/tfJmp54GMl#DadasahebPhalkeAward pic.twitter.com/GsbtZJXV25
— ANI Digital (@ani_digital) February 20, 2022
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
>> चित्रपट सृष्टीतील योगदान – ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख
>> बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म – अनदर राऊंड
>> बेस्ट डायरेक्टर – केन घोष, ‘स्टेज ऑफ सेज : टेम्पल अटॅक’
>> बेस्ट सिनेमॅटोग्राफर – जयकृष्णा गुम्माडी, ‘हसीना दिलरुबा’
>> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सतिश कौशिक, ‘कागज’
>> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दल्ला, ‘बेल वॉटम’
>> सर्वोत्कृष्ट अभिनेता निगेटिव्ह रोल – आयुष शर्मा, ‘अंतिम’
>> पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेता – अभिमन्यू दसानी
>> पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेत्री – राधिका मदन
>> सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
>> सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीस सिंग, ’83’
>> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सॅनन, ‘मिमी’
>> बेस्ट डेब्यू – अहान शेट्टी, ‘तडप’
>> फिल्म ऑफ द इयर – पुष्पा : द राईज
>> बेस्ट वेब सिरीज – कॅन्डी
>> सर्वोत्कृष्ट अभिनेता, वेब सिरीज – मनोज वाजपेयी, ‘फॅमिली मॅन 2’
>> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, वेब सिरीज – रविना टंडन, ‘आरण्यक’
>> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – विशाल मिश्रा
>> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर
>> सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट – पाऊली
>> सर्वोत्कृष्ट मालिका – अनुपमा
>> सर्वोत्कृष्ट अभिनेता, टेलिव्हिजन – शाहीर शेख, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’
>> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, टेलिव्हिजन – श्रद्धा आर्या, ‘कुंडली भाग्य’
>> सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेता, टेलिव्हिजन – धीरज धूपर
>> सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेत्री, टेलिव्हिजन – रुपाली गांगुली
>> सर्वोत्कृष्ट समिक्षक चित्रपट – सरदार उधम
>> सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा, ‘शेरशाह’
>> सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेत्री – कियारा अडवाणी, ‘शेरशाह’
हेही वाचा-