बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या आवाजाने संपूर्ण जगाला वेड लावले. प्रत्येक गायकाची एक वेगळी शैली, एक वेगळी ताकद राहिली आहे. या गायकांना मिळालेले लोकांचे प्रेम देखील अमाप होते. मात्र या सर्वांमध्ये एका गायक नेहमीच वेगळा ठरला आणि हा गायक म्हणजे दलेर मेहंदी. दलेर मेहंदी यांनी त्यांच्या भारदस्त आवाजाने लोकांना थिरकायला भाग पडले.
तो आला…त्याने गायले…आणि तो जिंकला… असेच दलेर मेहंदी यांचे वर्णन करता येईल. पंजाबी आणि हिंदी गाण्यांना एक वेगळी उंची देणारा आणि त्यांना लोकांच्या मनात स्थान मिळवून देणारा हा गायक म्हणजे संगीत क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल. दलेर मेहंदी यांनी गाण्यांना एक नवीन ओळख, नवीन रूप देत लोकांना पर्यंत पोहचवले. शुक्रवारी (दि. 18 ऑगस्ट) हेच दलेर मेहंदी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.
दलेर मेहंदी यांचा जन्म 18 ऑगस्ट 1967 साली बिहार मधील पाटणामध्ये झाला. वयाच्या 11 वर्षी त्यांनी गोरखपुरच्या उस्ताद राहत अली खान यांच्याकडून गाणे शिकून घेण्यासाठी त्यांनी घर सोडले. 13 वर्षी त्यांनी 20 लोकांपुढे स्टेजवर परफॉर्मन्स दिला. येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. (daler mehndi birthday special)
दलेर मेहंदी यांचे आईवडील डाकू दलेर सिंग नावाने इतके प्रभावित झाले होते, की त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव दलेर ठेवले. दलेर जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी गायक परवेज मेहंदी यांच्या नावावरूनच त्यांचे नाव दलेर मेहंदी ठेवले. दलेर मेहंदी यांचे ‘बोलो ता रा रा रा’ हे गाणे एका रात्रीत एवढे प्रसिद्ध झाले की, या गाण्याच्या 20 मिलियनपेक्षा अधिक कॉपी विकल्या गेल्या. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
पंजाबी इंडस्ट्रीमध्ये धमाका करणाऱ्या दलेर मेहंदी यांना त्यांचे मित्र नेहमी बॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला दयायचे. त्यावर दलेर एकच सांगायचे जेव्हा पाजी बोलावतील तेव्हा मी नक्कीच जाईल. त्यांच्या मित्रांना पाजी म्हणजे धर्मेंद्र वाटायचे. मात्र दलेर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचे. त्यांना यावरून त्यांचे मित्र म्हणायचे अमिताभ का बोलावतील? पण त्यांचं अविश्वास होता, आणि झालेही तसेच काही महिन्यांनी अमिताभ यांनी त्यांना फोन केला आणि गाण्याची ऑफर दिली. ती ऑफर त्यांनी हसत हसत स्वीकारली.
दलेर मेहंदी हे देखील त्यांच्या भावाप्रमाणे मिका सिंग प्रमाणे नेहमी विवादात राहिले आहे. त्यांच्यावर आरोप लावला गेला होता की, ते लोकांकडून त्यांना परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवत पैसे उकळतात. त्यांच्यावर अजून एक आरोप झाला होता की ते मानव तस्करी करतात. या आरोपाखाली ते दोन वर्ष जेलमध्ये देखील राहून आले आहे.
यासोबत त्यांचा आणि यशराजचा वाद देखील खूप प्रसिद्ध आहे. दलेर मेहंदी यांनी ‘झूम बराबर झूम’ वरून यशराज फिल्म्सला नोटीस पाठवली होती. त्यांनी त्यांच्या आरोपांमध्ये म्हटले होते की, त्यांच्या आवाजा ऐवजी शंकर महादेवन यांच्या आवाजाचा वापर केला गेला.
महत्त्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! रिलीजच्या 3 आठवड्यांनंतर आलिया-रणवीरच्या सिनेमाला यश; किती कोटी छापले वाचाच
अक्षयने ‘OMG 2’साठी घेतलेल्या मानधनाविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘त्याने एक रुपड्याही…’