Monday, September 25, 2023

नाद नाद नादच! रिलीजच्या 3 आठवड्यांनंतर आलिया-रणवीरच्या सिनेमाला यश; किती कोटी छापले वाचाच

एनर्जी ठासून भरलेला अभिनेता रणवीर सिंग आणि ‘बबली गर्ल’ आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ सिनेमा जुलै महिन्यात रिलीज झाला होता. मात्र, आता ऑगस्टचा अर्धा महिना संपूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकला असून चांगली कमाई करतोय. सिनेमाला रिलीज होऊन 3 आठवडे रिलीज झाले आहेत. अशात रॉकी और रानी की प्रेम कहानी 300 कोटी रुपयांची कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. दिग्दर्शक करण जोहर याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

काय म्हणाला करण जोहर?
करण जोहर (Karan Johar) याने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमची प्रेम कहाणी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि हृदयापर्यंत पोहोचला आहे. विनम्र आणि आभारीपणाची जाणीव होत आहे. खासकरून रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी दिलेल्या प्रेमासाठी. धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

भारतात किती छापले?
रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमा लवकरच 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. सिनेमाने पहिल्या आठवड्यात 73.33 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच, दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 47.45 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 19.24 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर सिनेमाची एकूण कमाई 140.02 कोटी रुपये झाली आहे.

बॉक्स ऑफिसवर सध्या चालणाऱ्या सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर सनी देओल (Sunny Deol) याचा ‘गदर 2’ (Gadar 2) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहेत. अशात आलिया आणि रणवीरच्या सिनेमानेही आपली एक जागा मिळवली आहे. सिनेमाने गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट) 1.40 कोटी रुपयांची कमाई केली होती. दररोज सिनेमा 1 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई करत आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर सिनेमात आलिया आणि रणवीरव्यतिरिक्त शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. या सिनेमाद्वारे करणने सात वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. (big news rocky aur rani kii prem kahaani worldwide box office collection know here)

महत्त्वाच्या बातम्या-
अक्षयने ‘OMG 2’साठी घेतलेल्या मानधनाविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘त्याने एक रुपड्याही…’
ऋतिकसोबतच्या पदार्पणातील सिनेमाने जिंकलेले 92 अवॉर्ड, ‘Gadar 2’ला यश मिळताच म्हणाली, ‘त्याच्यासोबत पुन्हा…’

हे देखील वाचा