सेक्सी डान्स करत होती नोरा फतेही, किचनमधून आईने पाहताच फेकून मारली चप्पल! पाहा व्हायरल व्हिडिओ

सेक्सी डान्स करत होती नोरा फतेही, किचनमधून आईने पाहताच फेकून मारली चप्पल! पाहा व्हायरल व्हिडिओ


आपल्या डान्सने वेड लावणारी आणि मनमोहक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी नोरा फतेही खूपच कमी वेळात प्रचंड लोकप्रिय झाली. तिने संपूर्ण भारतीयांवर तिच्या सौंदर्याचे गारुड घातले आहे. मूळची कॅनेडियन असणाऱ्या नोराने भारतीय सिनेसृष्टीमधे मेहनतीने स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली.

नोराने २०१४ साली आलेल्या ‘रोअरः टाइगर्स ऑफ द सुंदरबन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र तिने तिच्या डान्समुळे एक वेगळी ओळख निर्माण केली. नोरा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. तिला लाखो फॅन्स फॉलो करतात.

नोरा नेहमीच तिचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या नोराचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे, या डान्स मधेच तिची आई तिला चप्पल मारून फेकते. नोराच्या या व्हिडिओला आतापर्यंत ८८ लाख लोकांनी पाहिले आहे.

नोरा तिच्या या व्हिडिओमध्ये व्हॅम्प चॅलेंज पूर्ण करत आहे. या व्हिडिओमध्ये ती जबरदस्त डान्स करत असून, तिची आई किचनमध्ये काम करत आहे. त्यातच ती आई म्हणते, ‘ इथे माणसं कोरोनामुळे मरत आहे, आणि तुला व्हॅम्प चॅलेंज पूर्ण करायचे आहे,’ आणि तिला चप्पल मारून फेकते.

या व्हिडिओमधली गंमत म्हणजे यातली आईची भूमिका देखील नोरानेच साकारली आहे. हा व्हिडिओ बघताना फॅन्ससोबतच कलाकार देखील खूप हसताना दिसत आहे. अनेक फनी ईमोजी पोस्ट करत तिला या व्हिडिओवर रिप्लाय देखील मिळत आहे.

नोराच्या आगामी ‘छोड देंगे’ गाण्याचा टिझर नुकताच लाँच झाला आहे. या गाण्यात लाल ड्रेसमध्ये असणारी नोरा अतिशय आकर्षक दिसत असून, या गाण्यातला तिचा लुक आणि अभिनय चांगला दिसत आहे. या गाण्याआधी देखील नोराच्या अनेक गाण्यांनी इंटरनेटवर धमाल माजवली आहे. आता हे गाणे देखील तसेच हिट होणार यात शंका नाही. नोरा लवकरच अजय देवगनच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा- 

इंडियाज बेस्ट डान्समध्ये दिसली टेरेंस-नोराची रोमॅंटिक केमिस्ट्री,  पहला पहला प्यार है गाण्यावर केला डान्स

 एक तो कम जिंदगानी गाण्यावर नोरा फतेहीचा भन्नाट डान्स; पाहा जबरदस्त मुव्ह

प्यार दो, प्यार लो! नोरा फतेही जिंकलो लाखो चाहत्यांची मनं, जबदस्त डान्स आणि अफलातून मुव्ह करत केली धमाल


Leave A Reply

Your email address will not be published.