भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे कलाकार होऊन गेले ज्यानी बालकलाकार म्हणून काम केलं आणि त्यांनी त्याच्या अभिनयातुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. आसाच एक अमिर (amir)खानचा हिंदी चित्रपट ज्याचे नाव घेताच त्यातील बालकलाकराचे आठवण येते. हा चित्रपट म्हणजे ‘तारे जमीन पर’ आहे. तर यातील बालकलाकार ज्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले. आणि तो कलाकार म्हणजे ईशान अवस्थीची भूमिका साकारणाऱ्या दर्शील सफारी आहे.
2007 मध्ये हा ‘तारे जमीन पर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दर्शीलने एका ऑटिस्टिक मुलाची भूमिका साकारली होती, ज्याला त्याचे वडील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतात. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 19 वर्षे झाली आहेत. तर आता या काळात दर्शीलमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. ‘तारे जमीन पर’मध्ये काम करताना तो फक्त 10 वर्षांचा होता आणि आता तो 29 वर्षांचा आहे. अलीकडेच दर्शीलचे काही फोटो समोर आले आहेत. आणि ते पाहुन लोक थक्क झाले आहेत.
‘तारे जमीन पर’मध्ये दर्शीलने एका निरागस मुलाची भूमिका साकारली होती. तर तो 10 व्या वर्षी त्याने ज्या प्रामाणिकपणाने अभिनय केला, त्यानंतर त्याने बालकलाकार म्हणून ‘बम बम बोले’ मध्ये काम केले होते. आणि 2013 मध्ये थोड्या गॅपनंतर तो पुन्हा पुनरागमन केले तर त्यानंतर त्याने अनेक मालिका, चित्रपटामध्ये काम केले होते. तर लास्ट तो 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुले’ या चित्रपटांमध्ये तो दिसला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘महाभारत’मधील नकुल-सहदेव आठवतात ? ऑनस्क्रीन जुळी जोडी, तर ऑफस्क्रीन होते सख्खे भाऊ










