‘रंगीली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजकुमार हे नेहमीच त्यांच्या एका वेगळ्या अंदाजामुळे बॉलिवूडमध्ये ओळखले जातात. त्यांची प्रत्येक स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडते. हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेते राजकुमार यांचा जन्म ८ ऑक्टोंबर १९२६ साली बलचिस्तानमध्ये झाला होता. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सदाबहार चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा डायलॉग बोलण्याचा अंदाज देखील खूप वेगळा होता. तसेच त्यांचे अनेक डायलॉग आजही लोकप्रिय आहे. आज ३ जुलै राजकुमार यांची पुण्यतिथी आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी. ( Death anniversary of actor rajkumar, let’s know about his life)
राजकुमार हे १९४० मध्ये मुंबईला आले होते. तेव्हा ते पोलिसात सब इन्स्पेक्टरची नोकरी करत होते. ते मुंबईमध्ये ज्या पोलिस स्टेशनला काम करत होते, तिथे अनेकवेळा चित्रपटसृष्टीतील लोकांचे येणे जाणे चालू असायचे. एकदा चित्रपट निर्माते बलदेव दुबे हे कोणत्यातरी कामासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले होते.
जेव्हा ते राजकुमार यांच्याशी बोलले, तेव्हा त्यांना राजकुमार यांची बोलण्याची शैली खूप आवडली आणि त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यावेळी राज कुमार यांनी देखील त्यांच्या या प्रस्तावाला होकार दर्शवला आणि नोकरीचा राजीनामा देऊन चित्रपटाची शूटिंग करायला सुरुवात केली .
एका प्रवासात राजकुमार यांची ओळख जेनिफर हिच्याशी झाली. ती एक फ्लाईट अटेंडेट होती. नंतर त्यांच्यात प्रेम झाले. त्या दोघांनी लग्न देखील केले. नंतर जेनिफरने तिचे नाव बदलून गायत्री असे ठेवले. गायत्री आणि राजकुमार यांना 3 मुलं आहेत. त्यापैकी पुरू राजकुमार आणि पाणिनी राजकुमार ही दोन मुलं आणि वास्तविकता राजकुमार ही एक मुलगी आहे.
राजकुमार आणि गोविंदा हे एकदा शूटिंग करत होते. त्यावेळी गोविंदाने खूप छान शर्ट घातला होता. शूटिंग संपल्यावर जेव्हा गोविंदा आणि राजकुमार बोलले, तेव्हा राजकुमार गोविंदाला म्हणाले होते की, “तुमचा शर्ट खूप छान आहे.” राजकुमार यांच्या तोंडून असे शब्द ऐकून गोविंदा खूप खुश झाला होता.
त्यावेळी गोविंदा म्हणाला की, “सर जर तुम्हाला माझा शर्ट आवडला आहे, तर तो तुम्हाला घ्या.” त्यावेळी त्याने राजकुमार यांना त्याचा शर्ट दिला. गोविंदा हा विचार करून खूप खुश झाला होता की, आता राजकुमार त्याचा शर्ट घालणार आहेत. परंतु दोन दिवसांनी जेव्हा गोविंदाने पाहिले, तेव्हा राजकुमार यांनी त्या शर्टचा रुमाल बनवला होता. अशीच घटना एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील घडली आहे.
एकदा एका पार्टीमध्ये अमिताभ बच्चन आणि राजकुमार भेटले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी एक विदेशी सूट घातला होता. तेव्हा राजकुमार यांनी त्यांच्या सूटचे खूप कौतुक केले होते. अमिताभ बच्चन यांनी जेव्हा खुश होऊन त्यांना जेथून सूट घेतला आहे, त्या जागेचा पत्ता सांगत होते, तेव्हा राजकुमार म्हणाले की, त्यांना पडदे शिवायचे आहेत. त्यावेळी अमिताभ बच्चन केवळ हसतच राहिले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-