Sunday, October 1, 2023

चित्रपटाचे मैदान गाजवणारी अभिनेत्री सौंदर्याचा शेवट होता फारच भयानक, रजनीकांत अन् बिग बींसारख्या दिग्गजांसोबत केले होते काम

काही चित्रपट असे असतात ज्यांना बऱ्याचदा टीव्हीवर दाखवले जाते. प्रेक्षकही ते चित्रपट आवडीने बघत असतात. काही असे चित्रपट आहेत की, प्रेक्षकांना त्या पात्रांसकट त्या चित्रपटाची संपूर्ण गोष्ट माहित झालेली असते. तरीदेखील प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर असे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहताना दिसतात. यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशम’ हा होय. या चित्रपटाला टीव्हीवर जास्त पसंती मिळाली आहे. या चित्रपटातील अभिनेत्री सौंदर्यालाही चांगला प्रसिद्धी मिळाली आहे. इतक्या गुणवान अभिनेत्रीचा शेवट मात्र खूप भयानक होता.

दक्षिण भारतीय अभिनेत्री सौंदर्याचा जन्म १८ जुलै, १९७२ रोजी कर्नाटकात झाला होता. तिचे वडील कन्नड उद्योगातील लेखक-निर्माते होते. सौंदर्या वैद्यकीय शिक्षण घेत होती. अभिनेत्री होण्याच्या तीव्र इच्छेने तिने वैद्यकीय शिक्षण सोडत चित्रपट क्षेत्रात भरारी घेतली. सौंदर्याने आपल्या करिअरची सुरुवात ‘गंधर्व’ चित्रपटातून केली. यानंतर तिने अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये दिसली. सौंदर्याच्या चेहऱ्यावरील साधेपणा आणि डोळ्यांमधील चमक यामुळे तिने कमी वेळातच चाहत्यांची मने जिंकली होती.

सौंदर्याने सुमारे १०० चित्रपटांमध्ये काम केले. रजनीकांत आणि कमल हासन यांसारख्या दक्षिणेतील दिग्गज कलाकार असलेल्या चित्रपटांमध्येही सौंदर्या झळकली होती. मात्र, सूर्यवंशम या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यासह साकारलेल्या भूमिकेमुळे तिला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली होती.

सौंदर्या चित्रपटांमध्ये लोकप्रिय झाली खरी, परंतु काही काळानंतर तिने राजकारणात उडी घेतली होती. सन २००४ मध्ये लोकसभा निवडणुका जोरात सुरू झाल्या असताना काही विधानसभा निवडणुकाही घेण्यात आल्या. आंध्रप्रदेशातही निवडणुकीचे वातावरण होते. त्याचवेळी करीमनगर मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते विद्या सागर निवडणूक लढवत होती.

सौंदर्या राव यांचे खासदार आणि टीडीपी नेत्यांच्या विधानसभेसाठी मतांची मागणी करीत होते. त्यावेळी त्या बंगळुरूमध्ये होत्या. १७ एप्रिल रोजी त्यांचे विमान जक्कूर एरोड्रसहून निघाले. त्यांच्यासोबत त्यांचा धाकटा भाऊ आणि तेलुगु चित्रपटांचे निर्माते अमरनाथ होते. अचानक मोठा स्फोट झाला आणि विमान कोसळले. या अपघातात सौंदर्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ आणि निर्माते यांचे निधन झाले. जेव्हा समजले ती आई होणार होती, तेव्हा  प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आले होते. तिचा जीवनप्रवास अबाधित राहिला असता, तर तिने आपले नाव चित्रपटाच्या मैदानाप्रमाणेच राजकारणाच्या मैदानातही गाजवले असते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

अधिक वाचा- 
सलमानच्या नावे फेक कॉल्स… भाईजानने दिला ‘हा’ थेट इशारा; वाचा काय घडले?
दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा

हे देखील वाचा