देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाले, तरीही दोघांचे प्रेम अबाधित आहे. तसेच या दोघांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे. या दोघांनी आधी ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली होती. २००८ च्या या शोने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली होती. आता परत हे दोघे एकत्र काम करताना दिसणार आहे.
देबिनाने केले मुंडन
या दोघांनी ‘ शुभो बिजॉय’ नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र काम केले आहे. ही शॉर्ट फिल्म बिग बँगच्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी बनवली आहे. या शॉर्ट फिल्मची स्टोरी एका मुलाची आणि एका मुलीची आहे, जे प्रेमात पडतात आणि आनंदात जीवन जगत असतात. पण अचानक एका घटनेमुळे सगळे काही बदलून जाते. ( debina bonnerjee goes bald for short film shubho bijoya video tmov)
या शॉर्ट फिल्ममधून देबिनाने तिचा लूकही शेअर केला आहे. यात तिने तिच्या व्यक्तिरेखासाठी टक्कल केलेले दिसत आहे. तिने प्रत्यक्षात हे केलं नाही, परंतु मेकअपच्या मदतीने तिने स्वतः चे टक्कल केले आहे. तसेच तिने तिच्या सोशल मीडियावर हँडलवर याची एक झलक पोस्ट केली आहे. ज्यामुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
या दोघांची जोडी ‘शुभो बिजॉय’ या शॉर्ट फिल्मच्याद्वारे ११वर्षानंतर परत पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या दोघांनी पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्यांच्या लग्नाचे दिवस अनुभवले आहे. या चित्रपटासाठी एक बंगाली विधी विवाह सीन शूट करण्यात आला आहे. तसेच ही शॉर्ट फिल्म राम कमल मुखर्जी यांनी बनवली आहे.
गुरमीत चौधरीने आपल्या करियरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली आहे. त्याचा पहिला टीव्ही शो रामायाण होता. ज्यामध्ये त्याने रामाचा रोल केला होता. त्यानंतर त्याने भरपूर छोटे मोठे शो केले आहेत. गुरमित हा छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेता आहे. त्याची बॉलिवूडची सुरुवात २०१५ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘खामोशीया’ या चित्रपटापासून झाली होती. यामध्ये गुरमित शिवाय सपना पब्बी आणि अली फजल दिसले होते. साल २०२१मध्ये तो हॉरर चित्रपटात ‘द वाइफ’ मध्ये दिसला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात
-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स