Thursday, June 13, 2024

दीपिका कक्करने मुलाचं नाव ठेवताना केली ‘ही’ मोठी चूक; शोएब इब्राहिम म्हणाला…

टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरूवात झाली आहे. दीपिका आणि शोएब हे पालक झाले आहेत. दीपिकाने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम केले आहे. ती सोलश मीडियावर सक्रिय असते. नुकताच 21जूनला दीपिकाने मुलाला जन्म दिला आहे. दीपिकाच्या मुलाची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याला बरेच दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले होते. आता दीपिकाने तिच्या मुलाच नाव ठेवल आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

दीपिकाने 21 जून रोजी मुलाला जन्म दिला आहे. या बातमीने तिचे चाहते खूप आनंदी झाले. आई- वडिल झालेल्या या जोडप्याने एक झलक दाखवत सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाचा अर्थ सांगितले आहे. त्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. दीपिकाने तिच्या मुलीचे नाव ‘रुहान’ असे ठेवले आहे. यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “आमच्या मुलाचे नाव तुमच्या सर्वांशी शेअर करत आहोत.”

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, हे जोडपे मुलाचे नाव सांगताना घरातील सर्व दिवे बंद करतात. त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे लहान मुलाचे नाव घोषित करतात. यानंतर शोएब म्हणतो की, दीपिकाला हे नाव आधीपासूनच खूप आवडते. आम्ही आधीच याबद्दल विचार केला होता, म्हणून त्याचे अधिकृत नाव रुहान शोएब इब्राहिम ठेवले आहे. नावाचा अर्थ सांगताना दीपिका म्हणाली की, मुलाचे नाव रुहान शोएब इब्राहिम ठेवले आहे, ज्याचा अर्थ दयाळू आणि आध्यात्मिक आहे.

दीपिका आणि शोएबने असेही सांगितले की, व्हिडिओमध्ये मुलाचे नाव चुकून समोर आले होते. दीपिका सांगते की, एडिटिंग दरम्यान ती ब्लाॅगमधील नाव कट करायला विसरली होती. त्यावर शोएब म्हणाला की, तुम्ही त्या क्लिपमध्ये आमच्या मुलाच नाव ऐकले आहे. पण जे घडते ते चांगल्यासाठीच होते. आता आम्ही तुम्हाला आमच्या तोंडून सांगत आहोत की त्याचे नाव रुहान शोएब इब्राहिम आहे. (Deepika Kakkar made ‘this’ big mistake while naming her child)

अधिक वाचा- 
प्रार्थना आणि सोनालीचं फन रील बघितला का? पाहा व्हिडिओ
अखेर इलियाना डिक्रुझचा ‘मिस्ट्री मॅन’जगासमोर, रोमँटिक डेटचे फोटो शेअर करत तिच्या बाळाच्या बाबांचा चेहरा दाखवला

हे देखील वाचा