Sunday, December 3, 2023

दीपिका कक्करने जुळ्या मुलांना दिला जन्म? पती शोएब इब्राहिमने केला खुलासा

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडपे शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्या घरी लवकरच चिमुकल्या बाळाचे आगमन हाेणार आहे. अभिनेत्री तिच्या प्रेग्नंसीचा शेवटचा महिना एन्जॉय करत आहे. त्याचवेळी, दीपिका जुळ्या मुलांची आई होणार असल्याच्या अफवाही उडत आहेत. दीपिका आणि शोएबने आता या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे आणि अभिनेत्रीची डिलिव्हरीची तारीख कधी आहे हे देखील सांगितले आहे.

लेटेस्ट व्लॉगमध्ये शोएब (shoaib ibrahim) याने सांगितले की, दीपिकाच्या प्रेग्नंसीबद्दल खोट्या बातम्या आणि व्हिडिओ पसरवले जात असल्याचे त्याला आढळले आहे. तो म्हणाला की, “काही लोक दावा करतात की, अभिनेत्रीने बाळाचे स्वागत केले आहे, तर काही लोक म्हणतात की, तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.” अशात शोएबने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. यासोबतच शोएबने चाहत्यांना सांगितले की, त्याची पत्नी दीपिकाची डिलिव्हरी कधी होणार आहे.

दिपिकाची डिलिव्हरी तारीख जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात असल्याचे त्याने व्लॉगमध्ये म्हटले आहे. दरम्यान, दीपिकाने चाहत्यांना तिच्या प्रेग्नंसीच्या आणि प्रसूतीबद्दलच्या कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. ती म्हणाले की, “मुलाबद्दल कोणतीही बातमी त्यांच्या अधिकृत हँडलवर शेअर केली जाईल.”

यापूर्वी दीपिकाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्यावर फेक प्रेग्नेंसीचा आरोप आहे. दीपिकाने सांगितले होते की, ‘तिने उघडपणे आपला बेबी बंप दाखवला नाही, त्यामुळे युजर्सचे म्हणणे आहे की, उशीचा वापर केला आहे.’ या आरोपांमुळे संतापलेल्या अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘तिला इतरांना दाखवण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही.’ असे मत अभिनेत्रीने व्लाॅगद्वारे स्पष्ट केले.(Tv actress dipika kakar given birth to twins husband shoaib ibrahim told what is the truth also revealed actress delivery date)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट
27 वर्षांनी भारतात हाेणार ‘मिस वर्ल्ड’ची स्पर्धा, 130 देशातील स्पर्धकांचा असेल समावेश

हे देखील वाचा