Thursday, February 22, 2024

संजू बाबाकडे आहे लाखोंची किंमत असणारे लक्झरी घड्याळं कलेक्शन, नजर टाका त्याच्या कलेक्शनवर

बॉलिवूडमधील टॉप अभिनेता म्हणून संजय दत्त ओळखला जातो. संजय हा नेहमीच त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच तुफान गाजला. त्याच्यावर झालेले विविध आरोप, तुरुंगवास आदी अनेक बाबींमुळे तो गाजला. मात्र त्याच्या फॅन्सवर याचा काहीही परिणाम झाला नाही. आजही केवळ संजय दत्तचे व्यक्तिमत्व पाहून त्याच्यावर घायाळ होणाऱ्या असंख्य तरुणी सापडतील.

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा असलेला संजयने त्याचे बालपण आणि जीवन अतिशय आनंदात आणि आलिशान पद्धतीने घालवले. रावाचा रंक झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय दत्त. आलिशान जीवन जगणारा संजय अचानक जेलमध्ये गेला आणि तिथे त्याने अतिशय खालच्या पद्धतीने त्याचे जीवन व्यतीत केले. मात्र त्याला याची जाणीव खूपच लवकर झाली आणि त्याने त्याचे जीवन सावरले. आज तो त्याचे आयुष्य आनंदाने आणि आलिशान पद्धतीने जगत आहे. संजय दत्तला देखील अतिशय मोठे छंद आहे. त्यात त्याचे घड्याळांवर असलेले प्रेम तर जग जाहीर आहे.

संजय दत्तच्या बालपणाबद्दल त्याच्या चित्रपटांबद्दल, अफेयरबद्दल आदी अनेक गोष्टींबद्दल आपण भरभरून ऐकले असेल. मात्र आता आपण त्याच्या एका छंदाबद्दल ऐकणार आहोत. त्याला घड्याळाचा खूपच शौक आहे. त्याला महागडी आणि ब्रँडेड घड्याळ खूपच आवडतात. जर तुम्ही त्याचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले तर त्याच्या प्रत्येक फोटोमध्ये एक नवीन घड्याळ आपल्याला त्याच्या हातात दिसेल.

संजय दत्तकडे देशी, परदेशी अशा अनेक विविध ब्रॅंड्सची अनेक घड्याळं आहेत. त्याने यातली काही घड्याळं घेतली आहे तर काही त्याला भेट म्हणून आली आहेत. त्याच्याकडे एक घड्याळ तर असे आहे, ज्यात एक आलिशान गाडी किंवा घर घेता येईल. घड्याळांबद्दल माहिती देणाऱ्या एका सोशल मीडिया अकाउंटवर याची माहिती आहे. याच माहितीमध्ये या घड्याळाची किंमत ४२ लाख २० हजार रिटेल प्राइज आणि ९५ लाख ५० हजार मार्केट प्राइज सांगण्यात आली आहे. संजय दत्तकडे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि आयकॉनिक घड्याळं आहेत यात वाद नाही.

संजय दत्तने मान्यता दत्तसोबत लग्न केले असून, त्याला दोन मुलं आहेत. त्याच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो ‘हेरा फेरी ३’मध्ये परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत दिसणार आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याच्या या सिनेमाची प्रेक्षकांना आतुरता होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल

राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…

हे देखील वाचा