Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन दुःखद! ‘या’ टेलिव्हिजन, चित्रपट अभिनेत्रीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळले मृत अवस्थेत

दुःखद! ‘या’ टेलिव्हिजन, चित्रपट अभिनेत्रीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळले मृत अवस्थेत

मनोरंजनविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. अनेक टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे नीलू कोहली. नीलू कोहली यांच्याशी संबंधित एक बातमी समोर येत आहे. नुकतेच नीलू यांच्या पतीचे दुःखद निधन झाले आहे. गुरुद्वारांमधून परतल्यानंतर फ्रेश होण्यास्तही ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

नीलू कोहली यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता नीलू यांचे पती हरमिंदर गुरुद्वारांमधून घरी परत आले. त्यानंतर ते बाथरूममध्ये गेले. त्यावेळी घरात फक्त ते आणि त्यांच्या घरी काम करणारा एक मुलगा हेच होते. बराच वेळ झाला हरमिंदर बाथरूममधून बाहेर आले नाही, म्हणून त्यांच्या घरी काम करणारा मुलगा बाथरूम जवळ गेले, त्याने त्यांना आवाज दिला मात्र काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने बाथरूम उघडून पाहिले तर ते बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यांना पाहून लगेच त्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. त्यांचा घरीच मृत्यू झाला होता.

दरम्यान नीलू कोहली यांच्या पतींना मधुमेह होता. मात्र त्यांना मधुमेह गंभीर स्वरूपाचा नव्हता. हरमिंदर यांचा मृत्यू अचानकच झाला. नीलू आणि हरमिंदर यांचा मुलगा परदेशात असून, तो भारतात येणार आहे. तो आल्यानंतर रविवारी २६ मार्च रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहे.

दरम्यान नीलू यांनी अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात दिल क्या करे, स्टाईल, पटियाला हाऊस, हिंदी मिडियम, ब्रेक के बाद, हाऊसफुल २, गोरी तेरे प्यार मै, बॉस, मनमर्जीया आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, गीत, ना बोले तुम ना मैने कुछ कहा, तेरा क्या होगा आलिया, छोटी सरदारनी, मॅडम सर आदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल

राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा