हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या महागड्या कपड्यांची नेहमीच सर्वत्र चर्चा होताना दिसत असते. चर्चेत राहण्यासाठी या अभिनेत्री अनेकदा महागडे कपडे घातलेल्या दिसून येतात. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दीपिकाच्या घायाळ करणार्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. आपल्या दमदार अभिनयाने तिने सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग कमावला केला आहे. दीपिकाच्या चित्रपटांप्रमाणे तिच्या महागड्या कपड्यांचीही नेहमीच चर्चा होताना दिसते. नुकताच तिने ‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशन वेळी घातलेल्या बॉडीकॉन ड्रेसची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
दीपिका पदुकोणच्या या ड्रेसचे फोटो डिझायनर शलीना नतानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दीपिका खूपच मनमोहक दिसत आहे. ‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दीपिकाने या ड्रेसवर फोटो शूट केले होते. सध्या हे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
सुंदर आणि मनमोहक दिसणार्या या ड्रेसची किंमतही तशीच आहे. या ड्रेसची मूळ किंमत तब्बल १, ०२,१०० आहे. मात्र डिस्काऊंटमध्ये हा याची किंमत ५१ हजार रुपये इतकी आहे. याआधीही दीपिका ‘गहराइयां’च्या प्रमोशनवेळी अशाच एका महागड्या आऊटफिटमध्ये दिसून आली होती, ज्याची किंमत ४१ हजार इतकी होती.
दरम्यान दीपिका सध्या तिच्या आगामी ‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, हा चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवां यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात दीपिका आपल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंड सोबतच रिलेशन बनवत असल्याचे दिसत आहे. याआधी चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वत्र चर्चा रंगली होती. यामध्ये दीपिकाच्या हॉट लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :