अवघे जग बॉलिवूडची लेडी स्टार दीपिका पदुकोणचे (deepika padukone) चाहते आहे. तिचे इन्स्टाग्रामवरही खूप चाहते आहेत. अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
खरं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने व्हायरल ट्रेंड ‘जस्ट अ वॉव लूकिंग…’ या ट्रेंडचा वापर केला. या रीलवर दीपिकाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की आता हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला 185 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. यासोबतच दीपिकाचा हा व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.
दीपिकाने तिच्या ट्रोलला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होताक, अलीकडेच दीपिका ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये दिसली होती. यादरम्यान दीपिकाने रणवीरसोबतच्या तिच्या ओपन रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलले होती. त्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. त्यानंतर तिच्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्यासाठी तिने हा व्हिडिओ शेअर केला होता. परंतु तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. या व्हिडिओला सगळ्यांचे खूप प्रेम मिळाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘टायगर 3’ रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचा बोलबाला, ऍडव्हान्स बुकिंगने केला 12 कोटींचा पल्ला पार
‘ती माझी सर्वात मोठी चूक’, मनोज मुंतशीर याने ‘आदिपुरुष’बाबत केले मोठे विधान