Thursday, June 13, 2024

‘सिंघम अगेन’मधील दीपिका पदुकोणच्या रावडी लूकवर रणवीर सिंग फिदा; म्हणाला, ‘आली रे आली…’

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने बहुचर्चित ‘सिंघम’ सीरिजमधील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा नाव ‘सिंघम अगेन’ असेल. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण, या चित्रपटात एक विशेष गोष्ट म्हणजे, यामध्ये दीपिका पदुकोण ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत दिसणार आहे.

दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘सिंघम अगेन’मधील पहिला लूक आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शक्ती शेट्टी ही भूमिका साकारणार आहे. दीपिका पदुकोणचा हा रावडी लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दीपिका पदुकोणचा पती अभिनेता रणवीर सिंहने बायकोच्या नव्या ‘सिंघम लूक’चं भरभरून कौतुक करत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

 रणवीरने तिचा पहिला लूक शेअर करत यावर “आली रे आली दीपिका पदुकोण…आग लगा देगी” असं कॅप्शन दिलं आहे. दीपिका पदुकोणनेही स्वतः सोशल मीडियावर तिचा ‘लेडी सिंघम’ लूक शेअर केला आहे. दीपिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, “आज मी एक नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. ‘सिंघम अगेन’मधील शक्ती शेट्टी या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे.”‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच त्याच्या प्रसिद्ध कॉप युनिव्हर्स चित्रपटाचा आणखी एक भाग घेऊन येणार आहे सिंघम फ्रँचायझी ‘सिंघम अगेन’. रोहित शेट्टी आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दीपिका पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. तिचा हा लूक ‘सिंघम अगेन’साठी आहे. अभिनेत्री रक्ताने माखलेले चेहरा दिसत आहे. (Ranveer Singh on Deepika Padukone raucous look in Singham Again)

आधिक वाचा-
करिश्मा कपूरने साडीमध्ये केला कहर, वयाच्या 48 व्या वर्षीही दिसतेय हॉट!
हेमा मालिनी यांच्यासमोर संजीव कुमार यांनी ठेवला होता लग्नाचा प्रस्ताव, मात्र ‘या’ अटीमुळे तुटले नाते

हे देखील वाचा