Monday, July 1, 2024

‘तिने लक्ष दिलं नसतं तर मी आज जिवंत नसते’; दीपिकाने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण(Deepika Padukone) तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते. दिपिका नेहमीच मानसिक आरोग्याबाबत बोलत असते. पण बॉलिवूडची हीच अभिनेत्री मध्यंतरी एका गंभीर आजाराचा सामना करत होती. हा आजार शारीरिक नाही तर मानसिक आजार होता. ती सध्या मानसिक लोकांना जागरुक करत आहे. तिने तिच्या मानसिक आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे.

दीपिका पदुकोण मानसिक आजारांशी सामना केला आहे. तिने या आजाराशी लढण्याचा तिचा प्रवास कसा होता याविषयी प्रथमच सांगितले आहे. अभिनेत्री सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे असून, 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिच्या मेंटल हेल्थ फाउंडेशन लिव्ह-लव्ह-लाफच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्रीने मानसिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. डिप्रेशनपासून कसे सामोरे जावे आणि या दरम्यान स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल तिने सांगितले आहे.

एका मुलाखतीत दीपिका म्हणाली की, 2015 या वर्षी मानसिक आजाराबद्दल खुलासा केला होता आणि सांगितले होते की, ती डिप्रेशनशी झुंज देत आहे. जेव्हा ती स्वतः यातून बाहेर आली, तेव्हा ती ‘लिव्ह-लव्ह-लाफ’ची स्थापना करत या संस्थेच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त लोकांना मदत करण्यास सुरुवात केली.

या आजाराबाबत मला काहीच कल्पना नव्हती. जर माझ्या आईने लक्षणे ओळखली नसते, तर मला या आजाराबाबत कळालेचं नसते, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. दीपिका पदुकोण ज्या आजाराबाबत बोलत होती. तो आजार मानसिक आजार होता. ती डिप्रेशनचा सामना करत होती. दीपिका पुढे म्हणाली की, “माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि प्रत्येक वेळी ते मला भेटायला यायचे, तेव्हा मी नेहमीच खंबीर राहायचे, जसे सर्व काही ठीक आहे. पण एकदा ते बंगळुरूला परत जात असताना मी पुर्णत खचलेले. यानंतर आईने मला काही प्रश्न विचारले, यावेळी मला एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी असे वाटले की देवाने त्यांना माझ्यासाठीच पाठवले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहिलं को-स्टारवर प्रेम, नंतर प्रसिद्ध मॉडेलवर फिदा झाला करण कुंद्रा; वाचा त्याच्या आयुष्यातील रोचक किस्से

कधीही न ऐकलेला किस्सा!! ‘या’ चित्रपटात ‘तो’ सीन करताना रेखा चक्क बेशुद्ध पडल्या, पुढे काय झालं? वाचा तुम्हीच

हे देखील वाचा