Sunday, June 23, 2024

Deepika Padukone : 119 कोटींच्या घरात राहते दीपवीर जोडी; दोघांकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

अभिनेत्री दीपिका पादुकोणनं(Deepika Padukone) चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. लवकरच ती आई होणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका-रणवीरच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.(Deepika Padukone Ranveer Singh ) दीपिकाने पोस्ट करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh)हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोघेही बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार असून लक्झरी लाईफ जगतात. या हिट कपलकडे करोडोंची संपत्ती आहे. तर जाणून घेऊयात दोघांच्या नेटवर्थबद्दल…

दीपिकाची गणना बॉलिवूडमधील सर्वात महागड्या आणि श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. 2023 मध्ये तिनं ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले. याशिवाय ती लवकरच ‘सिंघम अगेन’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’सह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त दीपिकाने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे ज्यातून तिची प्रचंड कमाई होते.

जाहिरातींबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका लेव्हीज, डायसन, एशियन पेंट्स, जिओ आणि चोपार्ड सारख्या ब्रँड्समध्ये दिसते. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, दीपिकाची अंदाजे एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे. तर रणवीरच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाल्यास. रणवीर सिंग एका चित्रपटासाठी 30-50 कोटी रुपये घेतो. रणवीर पेप्सी, चिंग्स, मन्यावर, बिंगो आणि हेड अँड शोल्डर्स सारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो.

रणवीर सिंहचे घर मुंबईतील वांद्रे येथील सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये आहे. बी टाऊनचा किंग खानच्या मन्नत बंगल्याजवळ ही अपार्टमेंट आहे. त्यामधील एका फ्लॅटची किंमत ११९ कोटी रुपये आहे. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार रणवीर सिंहची एकूण संपत्ती २४५ कोटी रुपये आहे.

एकूण दोघांची संपत्ती पाहायला गेलं तर, त्यांच्याकडे ब्युमोंडे टॉवर्स, वरळी, मुंबई येथे 5 बीएचके फ्लॅट आहे. याशिवाय प्रभादेवीमध्ये त्यांचे एक आलिशान महागडे घर आहे. या जोडप्याचा अलिबागमध्ये कोट्यवधींचा बंगलाही आहे.

रणवीर आणि दीपिका पदुकोण यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकूण संपत्ती ७४५कोटी रुपये आहे. म्हणजेच एकूण संपत्तीपैकी दीपिकाकडे ६७ टक्के तर रणवीरकडे ३३ टक्के मालमत्ता आहे.

हेही वाचा:

Deepika Padukone : बॉलिवूड मस्तानीने दिली गुड न्यूज, सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म

हे देखील वाचा