Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड ‘पुरुषाच्या चुकीसाठी स्त्रीला दोष देणे थांबवा’, हंसल मेहतानंतर आता रिचा चड्ढा आली शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ

‘पुरुषाच्या चुकीसाठी स्त्रीला दोष देणे थांबवा’, हंसल मेहतानंतर आता रिचा चड्ढा आली शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ

बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व  प्रसिध्द उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्नोग्राफी  प्रकरणी केस दाखल केली आहे. या प्रकरणात राज कुंद्राला अटक देखील करण्यात आली आहे. राजला अटक केल्यापासून शिल्पावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात  आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पाला सोशल मीडियावर नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहे.

हंसल मेहतानंतर, आता बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा देखील शिल्पा शेट्टीचे समर्थन करतानी दिसली आहे. शिल्पाला पाठिंबा देताना रिचा म्हणते, “पुरुषाच्या चुकीसाठी एका महिलेला दोष देणे थांबवा.” रिचा चड्ढाने, हंसल मेहताच्या  ट्वीटला प्रतीउत्तर देत ट्वीट केले आहे. रिचाने लिहिले आहे की, “हा आमचा राष्ट्रीय खेळ बनला आहे, जेव्हा पुरुषाची चूक असते, तेव्हा आम्ही त्याला दोष देण्याऐवजी त्याच्या आयुष्यातील महिलेला दोष देणे सुरू करतो.

 

पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पाचाही सहभाग होता का, याविषयी मुंबई पोलिस गुन्हे शाखा बारकाईने तपास करत आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना शिल्पाविरुद्ध तपास प्रक्रियेत कोणताही पुरावा सापडलेला नाही. पण दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल ट्वीट केलं आहे, दिग्दर्शकाने लिहिलं आहे की, “जर तुम्ही शिल्पाबरोबर उभे नसाल, तर निदान तिला एकटं सोडा. तिला या क्षणी प्रायव्हसी द्या.”

शिल्पाने ‘या’ लोकांविरुद्ध दाखल केला खटला
दरम्यान, शिल्पा शेट्टीने अलीकडेच काही दिवसांपुर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पतीच्या अटकेनंतर चुकीच्या पद्धतीने टीका केल्याबद्दल आणि खोटी माहिती व बातमी दिल्याबद्दल विविध मीडिया हाऊस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरूद्ध खटला दाखल केला होता. मुंबई गुन्हे शाखेने अद्याप शिल्पा शेट्टीला पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात क्लीन चिट दिली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा