Thursday, March 28, 2024

प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

आयुष्याचा मार्ग दिसेनासा होतो, तेव्हा सोबत असते ती मैत्री. काळोखात काजवा बनून प्रकाशमान करते, ती असते मैत्री. मैत्रीच्या अनेक परिभाषा आहेत. अनेक रंग आहेत. आयुष्यात या नात्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अशातच ‘फ्रेंडशिप डे’ आला आहे. पण हा ‘फ्रेंडशिप डे’ काहीतरी वेगळा आणि खास आहे. कारण हा फ्रेंडशिप डे आपण साजरा करणार आहोत ‘आपली यारी’ सोबत.

नुकतेच दोन दिवसापूर्वी नादखुळा म्युझिक लेबलचे ‘आपली यारी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने केवळ दोनच दिवसात विक्रम केला आहे. या गाण्याला दोनच दिवसात १ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने गुरुवारी (२९ जुलै) तिचे हे गाणे सोशल मीडियाद्वारे लॉन्च केले आहे. बॉलिवूड निर्माता निखिल नमित आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी हे गाणे लॉन्च केले आहे. ‘फ्रेंडशिप डे’ च्या मुहूर्तावर रिलीझ झालेल्या या गाण्याला तरुण वर्गाचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या गाण्यात पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहे. (Prarthana behere’s Aapli yari song get 1 milian views in only two days)

यावरून प्रार्थना बेहेरे म्हणाली की, “नादखुळा या निखिलच्या म्युझिक लेबलवर ‘फ्रेंडशिप डे’ निमित्ताने ‘आपली यारी’ हे गाणे लॉन्च होत आहे. ते लॉन्च करण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद होत आहे. माझी आणि निखिलची खूप जुनी मैत्री आहे. त्यामुळे आमच्या मैत्रीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशिपवरचे गाणे मी लॉन्च करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”

‘आपली यारी’ या गाण्याचे गीत आणि संगीत प्रशांत नाकती यांनी दिले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनवणे यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्यातील सोशल मीडियावरील हे इन्फ्लुएन्सर खूप लोकप्रिय आहेत. कदाचित याच कारणामुळेच या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सगळ्यांना हे गाणे खूपच आवडले आहे. या गाण्यात पहिल्यांदाच निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉबी हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राने, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतीक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एका गाण्यात एकत्र दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीने शेअर केला वाढदिवसाचा लेट नाईट पार्टी व्हिडिओ; सिद्धार्थनेही लावली हजेरी

-कियारा आडवाणीने शेअर केला वाढदिवसाचा लेट नाईट पार्टी व्हिडिओ; सिद्धार्थनेही लावली हजेरी

-जरीन खानने स्टायलिश लूकमध्ये दाखवला तिचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज

हे देखील वाचा