सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता मानला जातो. त्याचे नाव स्वतःमध्येच एक ब्रँड आहे. सलमान खानचे चित्रपट फ्लॉप असो वा सुपरहिट, त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये कोणतीही कमी येत नाही. जेव्हा-जेव्हा सलमान खानच्या नावावर वाद निर्माण होतो, तेव्हा चाहत्यांनी अभिनेत्याला भरपूर पाठिंबा दिला.
वादांबद्दल बोलायचं झालं, तर वादांच्या यादीत सलमान खानचं नाव पहिल्या क्रमांकावर येईल. कधी हिट अँड रन केस, तर कधी काळवीट प्रकरण. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सलमान खानशी संबंधित अशाच एका वादाबद्दल सांगणार आहोत, जेव्हा दिल्लीतील एका तरुणीने त्याला सर्वांसमोर कानाखाली मारली होती. (delhi girl slap salman khan in publicly actor did this in anger)
हे प्रकरण २००९ सालचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी सलमान खान दिल्लीत सुष्मिता सेन (Sushmita Sen), सोहेल खान (Sohail Khan), शिबानी कश्यप, विजेंदर सिंग आणि इतर अनेक सेलिब्रिटींसोबत पार्टी करत होता. एका ५ स्टार हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती, जिथे फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी नवी दिल्लीतील एका बिल्डरची मुलगी मोनिका त्या प्रायव्हेट पार्टीत दाखल झाली. रिपोर्टनुसार, यादरम्यान मोनिकाने सलमानला फक्त चापटच मारली नाही, तर सोहेल आणि सुष्मितासह सगळ्यांना शिवीगाळ करायला देखील सुरुवात केली. मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, शिवीगाळ करणाऱ्या मोनिकाने आधी तिच्या मेल फ्रेंडसोबत पार्टीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता.
खरं तर, पार्टीदरम्यान मुलगी पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती. मोनिकाला आत जाऊ देऊ नका, असे सोहेल खानने सुरक्षा रक्षकांना सांगितले. दरम्यान, सलमान खानने हा गोंधळ ऐकल्यानंतर तो मोनिकाने ज्या ठिकाणी गोंधळ घातला होता त्या ठिकाणी गेला. अचानक तरुणीने सुष्मिता सेनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सलमान खानने नम्रपणे तिला निघून जाण्यास सांगितले. तेव्हा अचानक तिने अभिनेत्याला चापट मारली. मात्र, या सर्व प्रकारानंतर सलमान खानचाही पारा चांगलाच चढल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र भडकण्याऐवजी त्याने सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून तरुणीला पार्टीतून बाहेर काढले. सलमानचे हे वागणे त्याच्या चाहत्यांना पसंत पडले आणि अनेकांनी त्याचे कौतुकही केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा