Thursday, January 16, 2025
Home बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मुंबई न्यायालयाकडून समन्स…

अभिनेता सलमान खानला मुंबई न्यायालयाकडून समन्स…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अडचणीत अडकला आहे. या प्रकरणी पत्रकाराने अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सलमान खानला मुंबईतील न्यायालयाने ५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले होते. नंतर त्याविरोधात सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अभिनेत्याने आपल्या याचिकेत उच्च न्यायालयाकडे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश जारी करण्याची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर आता उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. उच्च न्यायालयाने सलमान खानला दिलासा दिला आहे.

‘हा’ आहे हायकोर्टाचा निर्णय
वास्तविक, उच्च न्यायालयाने सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी केली. ज्यामध्ये न्यायालयाने सलमान खानला दिलासा देत खालच्या न्यायालयाच्या समन्सला स्थगिती दिली आहे. अभिनेता आज म्हणजेच ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर होणार होता. मात्र निर्णयानुसार, न्यायालयाने सलमान खानला ९ मे पर्यंत वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली आहे. (salman khan challenges summons issued by mumbai court on journalists phone snatching case in hc)

काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण २०१९ सालचे आहे. पत्रकार अशोक पांडेने सलमान खानच्या विरोधात तक्रार केली होती. ज्यात त्याने सांगितले की, जेव्हा तो त्याच्या कॅमेरामॅनसोबत जुहूहून कांदिवलीला जात होता, तेव्हा त्याने सलमान खानला रस्त्यात पाहिले. यादरम्यान त्याला सलमान खान सायकल चालवतानाचा व्हिडिओ बनवायचा होता आणि त्याने अभिनेत्याच्या बॉडीगार्डची परवानगीही घेतली होती. पण जेव्हा त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा सलमान खानने त्याला विरोध केला. पत्रकाराने आरोप केला की, अभिनेत्याने त्याच्यावर हल्ला केला आणि नंतर त्याचा फोनही हिसकावला. सलमान खानच्या बॉडीगार्डवर पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोपही आहे.

‘या’ कलमांतर्गत दाखल झाला गुन्हा
पत्रकाराच्या या आरोपांनंतर सलमान खानवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अहवालात म्हटले आहे की, अभिनेत्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा