गँगस्टर सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचेही नाव आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्रीची अनेकदा चौकशी केली आहे. त्याच वेळी, अभिनेत्रीने या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ECIR (FIR) आणि अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावर आता हायकोर्टाने प्रतिक्रिया दिली आहे.
एफआयआर रद्द करण्याच्या जॅकलिनच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी ईडीकडून उत्तर मागितले. याप्रकरणी उच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. अभिनेत्रीच्या याचिकेवर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी ईडीला नोटीस बजावली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारीला होणार आहे.
Delhi High Court issues notice to Enforcement Directorate (ED) on actor Jacqueline Fernandez's plea seeking quashing of ECIR (FIR) and supplementary chargesheet filed by Enforcement Directorate in Rs 200 crore money laundering case involving alleged conman Sukesh Chandrashekhar
— ANI (@ANI) December 21, 2023
आपल्या याचिकेत अभिनेत्रीने ईडीने दाखल केलेले दुसरे सप्लिमेंटरी चार्जशीट फेटाळण्याची मागणीही केली आहे. आणि ट्रायल कोर्टासमोर प्रलंबित असलेल्या संबंधित कार्यवाही रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जॅकलिन फर्नांडिस ही फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर विरोधात दाखल झालेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मनी लाँड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, ईडीने दिलेले पुरावे याचिकाकर्ता निर्दोष असल्याचा पुरावा म्हणून काम करतील आणि ती सुकेशचे लक्ष्य बनली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बर्थडे गर्ल करिश्मा शर्माचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
Mouni Roy ची परफेक्ट फिगर… फोटो पाहून चाहते हैराण