आपण करोडपती व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं असतं. एखाद्या व्यक्तीला असं वाटण यात काहीच गैर नाही. काही जण मेहनतीने, कष्ट करून, घाम गाळत पैसे कमवतात, तर काही जण आपल्या बुद्धीच्या चतुराईने पैसे कमावतात. करोडपती व्हायचं असंच एक स्वप्न शासकीय कर्मचारी बघत होता. याच स्वप्नाच्या जोरावर तो थेट ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पोहचला.
करोडपती व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव आहे देशबंधू पांडे. देशबंधू हे कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक खरेदी विभागाचे कार्यालयीन अधीक्षक आहेत. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेत त्यांनी ३ लाख २० हजार रुपये जिंकले. पण आता हेच पैसे त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत आहे. देशबंधू पांडें यांनी कोणत्या विचाराने या शोमध्ये आले असतील आणि आता त्यांच्यासोबत काय घडत आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभाग घेतल्याने देशबंधू पांडे यांना रेल्वे प्रशासनाने त्यांना कठोर शिक्षा दिलेली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार रेल्वे प्रशासनाकडून देशबंधूंची ३ वर्षांची पगारवाढ थांबवण्यात आली आहे. यामुळे ते फार चिंतेत आहेत. तसेच या सर्व प्रकारावर रेल्वे कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. पश्चिम मध्य रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव खालिद यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खालिद म्हणाले की,” रेल्वे प्रशासनाने देशबंधू पांडेंसोबत योग्य केले नाही. मजदूर संघ देशबंधू साठी न्यायालयाची लढाई लढणार आहे.”
देशबंधू त्यांच्या ११व्या प्रश्नामध्ये अयशस्वी ठरले. त्यांना विचारण्यात आलेला तो प्रश्न होता,” यापैकी कोणता देश पूर्णतः युरोप मध्ये येतो?” ६ लाख ४० हजारां साठी त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यांना यासाठी दिलेले पर्याय
१ : रूस
२: तुर्की
३: यूक्रेन
४: कजाकिस्तान
यामध्ये त्यांनी पर्याय प्रकांक १ रूस हे उत्तर दिले परंतु ते उत्तर चुकीचे होते. याचे बरोबर उत्तर यूक्रेन हे होते. या प्रश्नासाठी त्यांना लाईफ लाईनची मुभा होती. परंतु त्यांना आपले उत्तर बरोबर असल्याचे वाटत होते. त्यांचे ११ व्या प्रश्नाचे उत्तर चुकल्याने ते ३ लाख २० हजार रुपये जिंकून घरी परतले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ