झी मराठीवरच्या ‘देव माणूस‘ या गाजलेल्या मालिकेतील सर्वात लोकप्रिय झालेली देवमाणसाची व्यतिरेखा साकारणारा अभिनेता किरण गायकवाडचा बहुचर्चित सिनेमा ‘चौक‘ लवकरच सर्वत्र प्रदर्शित होतोय. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किरणची मालिकेपेक्षा जरा वेगळी आणि भन्नाट भूमिका या सिनेमात पाहायला मिळतेय. त्यामुळे त्याला या भूमिकेत बघायला त्याचे चाहते फार उत्सुक आहेत.
या चित्रपटात किरण (kiran gaikwad) व्यतिरिक्त प्रवीण तरडे, रमेश परदेशी, उपेंद्र लिमये, स्नेहल तरडे, शुभंकर एकबोटे, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे अशी तगडी स्टारकास्टसुद्धा आपल्याला बघायला मिळतेय. मनोरंजनाचा मसाला पुरेपूर भरलेला हा चित्रपट कधी एकदा बॉक्स ऑफिसवर येतोय आणि आम्ही तो बघतोय अशी अवस्था या दिग्गजांच्या चाहत्यांची झाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान ‘आरपार’ (Aarpaar) या युट्युब चॅनेलच्या ‘झिरो टू हिरो’ या अनोख्या सेगमेंटमध्ये किरण गायकवाडने दिलेल्या मुलाखतीत त्याने बरेच खुलासे केले आहेत. अभिनेता म्हणून लोकांच्या मनात घर करणारा हा अभिनेता आधी लोकांना चक्क स्वतः डीजच्या तालावर नाचवायचा. होय! अभिनेता होण्याआधी किरणने डीजे ऑपरेटर म्हणून काम केले आहे. शिवाय ह्या मुलाखतीत त्याने आपल्या आयुष्याबद्दल हृदयद्रावक किस्से सांगितले आहेत. त्यांच्याबाबत रोचक गोष्ट अशी की, मुलगा झाला म्हणून किरणचा जन्म होताच सारे जण आनंदात बुडाले. त्यामुळे वयात येईपर्यंत किरणला त्याची जन्मतारीखच माहिती नव्हती. अशात त्याची जन्म पत्रिकाच कुणी काढू शकत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.
https://youtu.be/UGaRda0wSos
या मुलाखतीचा पुढचा भाग लवकरच ‘आरपार’ वर प्रदर्शित होणार आहे. अशात पुढच्या भागात किरण काय खुलासे करणार आहे, ह्याची उत्सुकता सर्वत्र आहे.( Devamanus remained single due to this reason? The actor expresses regret and says…)










