मागील वर्षात एका मालिकेने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ कदाचित मराठीमधील ही अशी पहिलीच मालिका असेल ज्यातील मुख्य भूमिका नकारात्मक होती. आतापर्यंत क्राईम मालिकांमध्ये या मालिकेने टीआरपीच्या यादीत उच्चांक गाठला. मालिकेत किरण गायकवाड हा मुख्य आणि खलनायकाच्या भूमिकेत होता. या मालिकेने ऑगस्ट महिन्यात सगळ्यांचा निरोप घेतला. मालिकेचा शेवट काही असा झाला की, ज्यामुळे सगळेच प्रेक्षक संभ्रमात होते.
या मालिकेच्या प्रोमोपासूनच सगळ्यांनी मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. एक आगळी वेगळी कहाणी, मालिकेतील पात्र, डायलॉग, त्यांची भाषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खास करून भावल्या. तसेच किरण गायकवाड नकारात्मक भूमिकेत असूनही त्याचा कोणी राग केला नाही, तर त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुकच होत होते. अशातच ‘देवमाणूस’ या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. ती म्हणजे ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Devmanus serial’s secound part will come soon, promo viral on social media)
‘देवमाणूस’ मालिकेची निर्माती श्वेता शिंदे हिने सोशल मीडियावर ‘देवमाणूस २’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गाव आणि गावातील वाडा दिसत आहे. तसेच वाड्यातील डॉक्टरांच्या नावाची पाटी देखील तशीच असते. पण अचानक पाटी खाली पडते. ही पोस्ट शेअर करून तिने “देवमाणूस २ लवकरच” असे कॅप्शन दिले आहे.
हा प्रोमो पहिल्यानंतर आता प्रेक्षक ही मालिका बघण्यास खूपच उत्सुक झाले आहेत. अनेकजण कमेंट करून त्यांच्या टीमला शुभेच्छा देत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार ‘देवमाणूस २’ ही मालिका पुढील महिन्यात म्हणेजच डिसेंबरमध्ये चालू होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा